इब्राहिम खान गारदी (Ibrahim Khan Gardi)
पानिपतचे तिसरे युद्ध म्हणजे मराठेशाहीच्या इतिहासातील भळभळती जखम होय.
पानिपतच्या युद्धात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक बनलेल्या व मातृभुमि साठी लढ़ा देऊन आपले प्राण अर्पण करणाऱ्या विर जवानांच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान असायला हवा.
पानीपतचे युद्ध महाराष्ट्रासाठी किंवा महाराष्ट्राच्या हितासाठी नाही तर भारताच्या राजधानीच्या रक्षणार्थ झालेले युद्ध होय.
पाँडिचेरी येथे द ब्यूरी नावाचा एक कामगार अधिकारी होता. त्याच्या पालखीपुढे छडी घेऊन धावणारा एक लहानसा शिपाई म्हणून इब्राहिम खान काम करीत असे. इब्राहीम गारदी हा औरंगाबाद जवळील कायगाव टोक गावचा हुशार, मेहनती, मुलगा नोकरीसाठी देशभर फिरत होता. त्यास थोडेफार पोर्तुगीज येत होते. लवकरच त्याने आपल्या कार्यकर्तृत्वावर फ्रेंच फौजेत अंमलदारी मिळवली.
फ्रेंचांच्या पलटणीतील अधिकारी बुसी या अधिकाऱ्याच्या आधिपात्याखाली डि ला गार्डी याने इब्राहिमखान गारदीस प्रशिक्षण दिले होते. इब्राहिमखान गारदी बुसीचा चेला होता. बुसी याने हिंदुस्थानात प्रथम इब्राहिम खान गारदयाच्या नेतृत्वाखाली गारद्यांची पलटण तयार केली.
पुढे फ्रेंचांची नोकरी सोडून तो निरनिराळ्या दरबारांत आपली कर्तबगारी दाखवू लागला. वेगवेगळ्या दरबरात नौकरी करता करता इब्राहीम गारदी हैदराबाद निजामाच्या सेवेतही गेला येथेच इब्राहिम गारदीस खान ही पदवी बहाल केली असे सांगतात. मराठ्यांकडे मुज्जफरखान हा तोफखाना चालविणारा एक उत्तम गारदी होता. परंतु, तो जितका हुशार,कल्पक, तितकाच बेइमानी आणि खुनशी होता. त्याच्या ह्या वृत्तीमुळे सदाशिवराव भाऊ आणि त्याचे पटत नसे. इब्राहिमखान हा वऱ्हाडात निजाम अलीकडे काही दिवस होता. पेशवा आणि निजाम यांच्यात डिसेंबर १७५७ साली सिंदखेडला झालेल्या लढाईत इब्राहिमखान गारदी निजामाकडे नोकरीस आसल्याने तो निजामाकडून लढला. मराठ्यांनी निजामाचा पराभव केला. पुढे सलाबतजंगने बसालतजंगास आपला कारभारी म्हणून बदलून त्या जागी निजामअलीची नेमणूक केली. हैद्राबादच्या दरबारात अनेक राजकिय घडामोडी झाल्या त्यामुळे अनेक नोकर चाकर बदलावे लागले. सलाबतजंगने निजाम अलीची नेमणूक करताना निजाम अलीने इब्राहिम खान गारदयास नोकरीवरून काढावे, ही अट ठेवली.
जून १७५८ नंतर याचा फायदा घेऊन मराठ्यांनी इब्राहिमखानास व त्यांच्या गारदी पलटणीस आपल्या मराठा सेनेत सामावून घेतले. उदगीरच्या लढाईत हा सदाशिवराव भाऊंच्या बरोबर इब्राहिम खान गारदी होता. याने या ठिकाणी मोठा पराक्रम गाजविला. या उदगीरच्या लड़ाईनंतर सदाशिवराव भाऊंचा इब्राहिमखान गारदी वरचा विश्वास वाढला. उदगीरनंतर सदाशिवराव भाऊंची पानिपतावर रवानगी झाली. पानिपतच्या लड़ाईस जाताना सदाशिवराव भाऊंच्याबरोबर मराठा सरदामध्ये इब्राहिमखान गारदी प्रमुख सरदार होता.
अमदशाह अबदाली १७४८ पासून हिंदुस्थानवर स्वाऱ्या करू लागला होता. त्याने १७५१ च्या अखेरीस प्रचंड सैनिकांस लाहोरपर्यंत येऊन पंजाबचा काही भाग बळकविला होता. वाटेमध्ये येणाऱ्या ठिक-ठिकाणच्या प्रदेशांत प्रचंड लूट पाट करीत तो पुढे पुढे सरकत होता हा राजधानीवर येतो की काय, या भीतीने बादशाहाने त्याचा प्रतिकार करण्याचे वजीरास सुचविले आणि वजीराने १७५२ च्या मार्च महिन्यात मराठे सरदारांशी करारनामा केला.
अहमदशहा अबदाली १७५७ मध्ये सरळ राजधानी दिल्लीला येऊन धडकला. आग्रा, मथुरा, वृंदावन व यांच्या आसपासच्या प्रदेशात लुट पाट करून अहमदशहा अबदालीने अपार संपत्ती मिळविली पंजाब प्रांतात आपले अधिकारी नेमले. अहमदशहा अबदालीची पाठ फिरते न फिरते तोच राघोबादादांनी मराठ्यांच्या फौजा घेऊन अबदालीची ठाणी उठविण्यास सुरुवात केली आणि दिल्लीच्या बादशाहाच्या वतीने पंजाबचा बंदोबस्त आरंभिला होता.
अहमदशहा अबदाली स्वस्थ बसणाऱ्यांपैकी नव्हता त्यातच अहमदशाह अब्दालिला दिल्लीवर विजय मिळवण्यासाठी नजीब खान रोहील्याने पत्रव्यव्हार करून १७५९ साली आमंत्रित केले होते. १७५९ च्या नोव्हेंबर महिन्यात अहमदशहा अब्दाली मोठ्या फौजेनिशी पंजाबात घुसला आणि मराठ्यांची ठाणी त्याने हस्तगत केली. रोहिल्यांना घेऊन दिल्लीनजीक शिंद्यांच्या फौजेस त्याने गाठले. या लढाईत दत्ताजी शिंदे गारद झाला आणि शिंद्यांच्या फौजेने रणांगणातून पळ काढला. मल्हारराव होळकर शिंद्यांच्या फौजेस मदतीस धाऊन आले पण आता वेळ निघून गेली होती. होळकरांचा गनिमी कावा अबदालीपुढे कुचकामी ठरला होता.
अहमदशहा अब्दालीला रोखण्याची व दिल्लीच्या रक्षणाची जिम्मेदारी मराठ्यांच्या नानासाहेब पेशवे यांच्यावर येऊन ठेपली होती.
पेशव्यांकडे बातमीदारांची पत्रे येऊ लागली की, वेळ आणीबाणीची आली आहे हिंदुस्थानातील आपला अंमल उठला आहे, अहमदशहा अबदाली दिल्लीस येऊन पोहोचला आहे आणि त्याने पंजाब, दिल्ली प्रदेश व्यापला आहे. दुआब, आग्रा व राजस्थानातील सर्व राजेरजवाड्यांकडे अहमदशहा अबदालीचे वकील रवाना झालेत. आतापर्यंत केलेली सर्व कमाई फुकट गेली. रोहिले अहमद शहा अबदालीस जाऊन सामील झाले. शिंदे-होळकरांचा पाडाव झाल्यापासून आपल्या फौजांनी धीर सोडला आहे आणि शत्रूला गर्व चढला आहे.
उत्तरेत जी बिकट समस्या निर्माण झाली होती, त्याची चर्चा करण्याकरीता नानासाहेब पेशव्याने आपल्या सरदारांना बोलाविले. एक आठवडाभर ऊहापोह होऊन असे ठरले की, नानासाहेब पेशवे यांचे चुलतभाऊ सदाशिवराव भाऊने उत्तरेत जाऊन शत्रूचा परिहार करावा.
सदाशिवराव भाऊ यांच्या सेनेत मल्हारराव होळकर, जनकोजी शिंदे, पुरंदरे, विंचुकर असे दिग्गज मातब्बर सरदार होतेच शिवाय खुद्द पेशवे पदाचा भावी वारसदार विश्वासराव सुद्धा होता. तेरा हजार निवडक हुजरात, बारा हजार सरदारांची फौज, इब्राहीमखान गारदीने तयार केलेले पाश्चात्त्य पद्धतीने लढणारे दहा हजार पायदळ आणि जंगी तोफखाना घेऊन १६ मार्च १७६० रोजी नानासाहेब पेशव्यांचे चुलत भाऊ सदाशिवरावभाऊ व नानासाहेब पेशवांचा मोठा मुलगा विश्वासरावासह उत्तरेची वाट चालू लागले.
१२ एप्रिलला विश्वासरावासह सदाशिवराव भाऊंनी नर्मदा ओलांडली आणि उत्तरेतील हिंदू, राजपूत, जाट, बुंदेले तसेच राजेरजवाडे आणि मुसलमान नबाब, अमीर-उमराव या सर्वांना मुगल बादशाहीच्या रक्षणार्थ एकत्र येण्याचे आवाहन केले.
दिल्ली दरबारात मराठ्यांना अनुकूल असा एक पक्ष होता. मराठ्यांच्या मदतीने बादशाही चालवावी असे या पक्षाचे मत होते. पण मराठ्यांच्या उत्तरेतील राजकारणामुळे व सततच्या आक्रमणामुळे अतिरिक्त जबरदस्ती कर वसुली मुळे आधीच निर्बल-कंगाल-लुटल्या गेलेल्या प्रांतांवर स्वा-या करणे, रयतेजवळ जे उरले-सुरले आहे तेही लुटने हा मराठ्यांचा एकमेव उद्योग बनल्यामुळे उत्तरेत मराठे रयतेच्या मनात कधीही आत्मीयतेचे स्थान मिळवू शकले नाहीत, हे वास्तव आजही अनुभवाला येते. याचा फटका पानिपत युद्धात मराठ्यांना बसला. ज्या तख्तासाठी म्हणुन ते पानिपतवर लढायला गेले, त्या तख्ताचे त्यावेळीचे स्वयंघोषित दोन्ही पातशहा दुरुन तमाशा बघत बसले. एकही मुस्लिम सरदार त्यांच्या बाजुने आला नाही…. याचे एकमेव कारण म्हणजे मराठ्यांची पराकोटीची स्वार्थलोलुपता आणि त्याआधारीत सोयीचे राजकारण. तसेच राजपूत, जाट यांच्या भांडणांत पडल्यामुळे दिल्ली दरबारात मराठ्यांना विरोध वाढला व द्वेषप्रेरित होऊन निजाम, जयपूरचा माधोसिंग, जोधपूरचा बिजेसिंग, नजीबखान व त्याचा गुरुतुल्य सहकारी शाह वलीउल्लाह यांनी अहमदशहा अबदालीस मराठ्यांची खोड मोडावी म्हणून निमंत्रण दिलेले होते. मराठ्यांशी सहकार्य करण्यास कोणी पुढे येईना. राजस्थान, बुंदेलखंड येथील राजे, नजीब सोडून मदतिस येतिल रोहिल्यांपैकी इतर सरदार व अयोध्येचा शुजाउद्दौला आपल्या साह्यास येतील, अशी खोटी आशा सदाशिवराव भाऊस वाटत होती पण सर्व फोल ठरले, सदाशिवराव भाऊंला एकाकी शत्रूला तोंड द्यावे लागले. परख्या अहमदशहा अबदालीला एतद्देशीय मदतनीस मिळाले. त्याचे कारण असे की अहमदशहा अबदाली काही झाले तरी येथे राहणार नसल्याने शेवटी आपणच सत्ताधारी होऊ, उलट मराठे सत्ताधारी झाल्यास आपणावर बंधने येतील, या विचाराने भाऊच्या मदतीस कोणी धाऊन आले नाहीत. अशा वेळी मराठ्यांच्या सेनेत मराठयांच्या बाजूने खंबीर पणे साथ देणारा एक सेनापती होता तो मुस्लिम होता त्याचे नाव इब्राहिम खान गारदी (Ibrahim Khan Gardi)
सदाशिवराव भाऊंचा मुख्य विश्वास होता तो आपल्या तोपची प्रमुख इब्राहिम खान गारदीवर. पानिपतच्या तिसऱ्या लढाईत इब्राहीम खान गारदी यांनी गारद्यांच्या तुकडीचे नेतृत्व केले होते. तुकडीचे नेतृत्व असल्याने त्याने खान या नावाची पदवी धारण केली होती. इब्राहिम खान गारद्यांची तुकडी ज्यांच्या सैन्यात असे त्यांची इमानेइतबारे चाकरी करत असे.
पानिपत च्या लड़ाईत इब्राहिम खान आणि त्याचा भाऊ फत्तेखान यांच्या खांद्यावर मराठ्यांच्या तोफदलाची संपूर्ण धुरा होती.
त्याच्या हाताखाली दहा हजार गारदी व शंभर तोफांचा तोफखाना होता.
(गारद्यांच्या तुकडीने फ्रेंच सैन्याकडून प्रशिक्षण व हत्यारे घेतल्यामुळे १७५० च्या दशकात मराठा सैन्याचे अतिशय प्रबळ सैन्यात रुपांतर होण्यात गारद्यांच्या तुकडीचा मोठा वाटा होता.)
असं म्हणतात कि इब्राहिमखान गारदीचे मराठा सेनेतील वाढते महत्व पाहून अनेक मातब्बर सरदार इब्राहिमखान गारदीवर नाखुश होते, त्यांनी सदाशिवराव भाऊंना इब्राहिमखान गारदी मुसलमान आहे तो कधीही दगा फटका करू शकतो असे शंकेचे वातावरण करण्याचा प्रयत्न केला होता.
वाटेत जमीनदारांचे दंगे व अकाली पाऊस, या कारणाने चंबळ नदी ओलांडून व अनेक अडीअडचणीस तोंड देत आग्र्यास पोहोचण्यास भाऊच्या फौजेस तीन-साडेतीन महिने लागले.
दत्ताजी शिंदेच्या निधनानंतर मराठा सरदार विस्कटलेल्या स्वरूपात होते ते सदाशिवराव भाऊ आणि विश्वासराव यांच्या येण्याची बातमी ऐकून पुन्हा सर्वजण एकत्र होऊ लागले होते त्याचबरोबर सूरजमल भी मराठयांना येऊन मिळाला.
आग्र्याच्या दक्षिणेस १८ जूनला शिंदे-होळकरांच्या भेटी झाल्या. भाऊचा पहिला बेत आग्र्याजवळ यमुनापार करून अंतर्वेदीत उतरून शत्रूस गाठावयाचा होता पण पाऊसकाळ लवकर सुरू झाला आणि यमुना दुथडी भरून चालली. बोटींचा पूल बांधून नदी ओलांडावयाचा विचार भाऊस सोडून द्यावा लागला.
१४ जुलैस फौजा आग्र्यास पोहोचल्या. भरतपुरचे जाट शासक महाराजा सूरजमल जाट देखिल सदाशिवराव भाऊंच्या सैन्यास मिळाले. २१ जुलैला या एकत्रित सैन्याने दिल्लीवर हल्ला केला व दिल्ली काबीज केली. विश्वासरावला दिल्लीच्या गादीवर बसवायचा भाउंचा मनसुबा होता. भाउंनी रसदेअभावी दिल्लीलुटायचा आदेश दिला. परंतु जाट शासक महाराजा सूरजमलनी त्याला विरोध केला व ते युतीच्या बाहेर पडले. ही घटना युद्धात निर्णायक ठरली असे बऱ्याच इतिहासकारांचे मत आहे. ०२ ऑगस्ट १७६० ला दिल्लि राजधानीच्या मराठा छावनी त ‘श्रीमंत विश्वासराव पेशव्यांचा दरबार’ आयोजित झाला.
२ ऑगस्टला राजधानीचे शहर मराठ्यांच्या ताब्यात आले.
दिल्ली घेतल्याने मराठ्यांचा दरारा वाढला खरा पण वास्तविक काही फायदा त्यांच्या पदरात पडला नाही. थोडी कुचंबणाच झाली. गेली दोन-चार वर्षे चाललेल्या दोन्ही फौजांच्या हालचालीत राजधानी आणि भोवतालचा प्रदेश अगदी धुऊन, पिळवटून निघाला होता दंग्यामुळे साल मजकूरचा ऐवज येईना संस्थानिक खंडणी देईनात सावकार परागंदा झाले कर्ज मिळेनासे झाले आणि इकडे भाऊचा खर्च तर बेसुमार वाढला. मोहीम सुरू झाल्यापासून दहा महिन्यांत पाऊण कोटीपर्यंत खर्च झाला आणि भाऊच्या हाती जेमतेम बावीस लाखपर्यंत रक्कम येऊन पोहोचली.
अहमदशहा अब्दाली या दिवसांत अनूपशहरात आणि तथा शुजाउद्दौला यमुना नदिच्या पलिकडे छावनी टाकून होते. पावसाळ्याच्या दिवसांमुळे यमुना नदि ला महापुर असल्याने अहमदशहा अब्दाली आणि मराठा सैन्य एकमेकांशी युद्ध करू शकत नव्हते. दोन्ही फौजांमध्ये यमुना नदी भरून चालली होती व तीचे पाणी अडीच-तीन महिने उतरण्याचा संभव नव्हता. दोन्ही पक्ष पावसाळा संपण्याची व सर्दिचे दिवस येण्याची वाट पाहू लागले होते. तेव्हा वाटाघाटीने काही निकाल लागतो की काय, हे पाहण्याकरिता बोलणी सुरू झाली पण ती निष्फळ ठरली. शुजाउद्दौलाच्या मार्फतीने सूचना आली की, बिहारमध्ये जाऊन बसलेला दुसऱ्या आलमगीराचा पुत्र शाह आलम यास गादीवर बसवावे आणि आपणास वजीर नेमून दिल्लीचा कारभार चालवावा. अहमदशहा अबदाली आणि मराठे या दोघांनी आपआपल्या देशांत परत जावे. शुजाउदौल्ला या वेळी अबदालीस सामील होऊन, शत्रूच्या छावणीत दाखलही झाला होता. त्याने सुचविलेल्या अटीस अबदालीची कितपत संमती होती, हे कळण्याचा मार्ग नव्हता. अबदाली हिंदुस्थानात येऊन जवळ-जवळ आठ महिने झाले होते. नजीब हा त्याचा मुख्य सहायक आणि मराठ्यांविरुद्ध उभारलेल्या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार होता. नजीबाच्या संमतीशिवाय आता तह होतो कसचा पण कदाचित शत्रुपक्षात फाटाफूट झाल्यास पहावे याकरिता भाऊने शुजाशी बोलणी चालू ठेवली. या वाटाघाटीतून निष्पन्न तर काही झाले नाही, उलट आपापसांतील वैमनस्यामुळे आणि स्वार्थामुळे जाटांच्या सर्व मागण्या मराठ्यांनी मान्य केल्या तरी, वजीर, गाझीउद्दीन आणि सुरजमल जाट भाऊस येऊन मिळाले नाहीत. जाटाने या संघर्षातून अंग काढून घ्यावे, हा त्याचा कृतघ्नपणाच होता. ग्वाल्हेर, भरतपूर, आग्रा हा जाटांचा मुलूख. ज्या प्रदेशांत मोहीम चालवावयाची, तेथील जमीनदारांचे साह्य मराठ्यांना आवश्यक होते. अयोध्येच्या शुजाउद्दौल्ला बद्दल भाऊस मोठी आशा वाटत होती. शुजास आपल्या बाजूस वळवून घेण्याबद्दल त्याने गोविंदपंत बुंदेल्यास पुनःपुन्हा लिहिले पण भाऊंच्या पत्रांचा उपयोग न होता शुजाउद्दौला अबदालीस सामील झाला. रोहिले सरदार, नजीब आधीच अब्दालीस मिळाले होते, याउलट एकही हिंदू राजा, राजपूत, जाट, बुंदेल भाऊस सामील न होता प्रकरणाचा निकाल कसा लागतो याची वाट पहात बसले. सर्व हिंदुस्थान एक होऊन पठाणांस विरोध करावा, या भाऊच्या हाकेस साथ मिळेना. अबदालीस पंजाब देऊन हे प्रकरण मिटविणे शक्य होते पण पंजाब राखण्याची तर पेशव्याची आज्ञा. कोणत्या तरी एका पक्षाने माघार घेतल्याशिवाय अंतिम निर्णय लागावा तरी कसा? तहाच्या वाटाघाटी निष्फळ ठरल्या, तेव्हा युद्धाच्या दृष्टीने भाऊच्या हालचाली सुरू झाल्या. या काळात काही मुस्लिम जाहगिर मराठ्यांना येऊन मिळाले त्यामुळे सुरजमल जाटाने नाराज होऊन या युद्धातून पुर्णतः माघार घेतली आणि भरतपुरला निघुन गेला. परंतु (युद्धात आणि त्यानंतर सुरज मल ने मराठा सैन्यांना शस्त्र, अन्न, वस्त्र व पैशा पुरवून मराठ्यांची सहायता केली.) त्यात दिल्ली कायमच्या लुटमारीमुळे भकास झाली होती. त्यामुळे मराठ्यांचा उपवास व्हायला लागला. वाटाघाटीतून काही निष्पन्न होईना आणि नदीचे पाणी उतरण्यास अद्याप महिना होता. फौजेची तर आबाळ होत चालली. ही कोंडी फोडावयाची कशी याचा विचार करता, दिल्लीपासून १२० किमी. उत्तरेस, यमुनेच्या पश्चिम किनार्यावर असलेल्या अबदालीच्या कुंजपुऱ्याच्या ठाण्यावर हल्ला करण्याचे भाऊने ठरविले कुंजपुरा लष्करी दृष्ट्या महत्त्वाचे ठाणे होते. अफगाण फौजांच्या उपयोगासाठी कुंजपुर्याच्या किल्ल्यात दहा हजार खंडी धान्य, चार-पाच हजार घोडी, दारूगोळा इ. सामग्री साठविण्यात आली होती. अशातच हवामान ठीक होताच सदाशिवराव भाऊनी यावर उपाय काढत आपला तळ कुंजपुरा जिंकण्यासाठी ८ ऑक्टोबर रोजी मराठी फौजांनी दिल्ली सोडली तिथे गेल्यावर बातमी कळली की, दत्ताजी शिंदेचे मारेकरी हे येथून उत्तरेस पाऊणशे मैलांवर असलेल्या कुंजपुरा किल्ल्यात आहेत. कुंजपुराकडे भाऊसाहेब निघाले, तेव्हा बातमी लागली की, कुतुबशहा व शहामतखान हे कुंजपुराच्या किल्ल्यात असून त्यांना अब्दाली कुमक पाठवणार आहे. तेव्हा सदाशिवराव भाऊंनी इब्राहिमखान गारदीस तातडीने बोलावून घेतले. हा रातोरात मजल-दरमजल करत तेथे दाखल झाला. सदाशिवराव भाऊंनी हल्ला करण्यास ठरवलेल्या वेळेस तीन घटका अवकाश होता. अजून तीन घटका अवकाश आहे, तूर्त न उठावे असा निरोप भाऊंनी पाठवला. तेव्हा इब्राहिमखान गारदीने उत्तर पाठवले की, मुहूर्त कशास पाहिजे, आम्ही किल्ला फत्ते करतो आणि हुजूर येतो. त्याप्रमाणे १७ ऑक्टोंबर १७६० ला इब्राहीमखानाच्या तोफांच्या मार्याने कुंजपुरा किल्ल्याच्या तटास खिंडार पाडले व त्यातून मराठी फौज आत घुसली. तेथे झालेल्या धुमश्चक्रीत मोमीनखान व किल्लेदार निजाबतखान, गिलजाई आणि चार हजार रोहिले मारले गेले. हल्ला करून किल्ला सर केला. युद्धात कुतुबशाह, अब्दुल समदखान आणि किल्लेदार निजाबत खान पकड़ले गेले नाजीब खानचा गुरू कुतुबशहाला जनकोजी ने व जमादाडे ने कापून काढले. ह्याच कुतुबशहा ने दत्ताजी शिंदेचा वध केला होता. सदाशिवराव भाऊंनी दत्ताजी शिंदेच्या बलिदाननाची आठवण करूण कुतुबशाह आणि समदखान चे कापलेले मुंडके अहमदशहा अब्दालीला पाठवून दिले. सरहिंदचा सुभेदार अबुस समदखान, मोमीनखान आणि नजीबचा सख्खा चुलतभाऊ नाजाबतखान ह्यांना समाधी दिली.
ठाण्यांतील सर्व सामग्री मराठ्यांच्या ताब्यात आली. विशेषतः धान्याची कोठारे हातात आल्यामुळे मराठी फौजेचा हुरूप वाढला. दुसर्या दिवशी मराठा छावणीत दसरा मोठ्या थाटाने साजरा करण्यात आला. तथापि शत्रुच्या कारवाया चालूच होत्या.
पाउस पडत असल्याने यमुना नदीच्या पलीकडून अहमदशहा अब्दालीला आपल्या सैन्याची काहीच मदत करता आली नाही. कुतुबशाह आणि समदखान चे कापलेले मुंडके पाहूण अहमदशहा अब्दाली नाराज झाला व पानिपत कडे निघण्यास जलद हालचाली करू लागला. चिडलेल्या अब्दालीने आपल्या सैन्याला भर पुरात यमुना ओलांडायचे आदेश दिले. गुलाबसिंग गुजर ह्याने अब्दालीला सांगितले की गौरीपूरला गचका उतार आहे. अहमदशहा अब्दालीने आपल्या फौजेला दाक्षिणीकडे वाटचालीस वळविले पीछाडीस असणारा शत्रू नदी ओलांडण्याचा प्रयत्न करील, असा अंदाज भाऊस आला नव्हता असे नाही पण पुरामुळे तो एवढ्या लवकर नदी पार करील असे वाटले नाही. पण अहमदशहा अबदाली काही सामान्य शत्रू नव्हता. मराठे उत्तरेकडे गेले, त्यांनी आपले मोक्याचे भक्कम ठाणे काबीज केले. पन अहमदशहा अब्दाली काही न करता हे स्वस्थपणे बसणाऱ्यांपैकी नव्हता. नदी पार करावयाचे त्याने ठरविले. बागपताजवळील शोधुन काढलेल्या एका उतारावरूण २३ ऑक्टोबरपासून त्याचे अफगाण सैन्य महाप्रयत्नाने दुआबातून नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर उतरू लागले. या ठिकाणी शत्रूस अटकाव करण्याकरता मराठ्यांची चौकीसुद्धा नव्हती. नदीचे जोराचे वाहते पाणी, चिखल, दलदल यास न जुमानता व सुमारे १,५०० सैनिक गमावून तीन दिवसांत २५ ऑक्टोंबरला अब्दाली सर्व सैन्य यमुना नदी उतरून यमुनेच्या पश्चिम किणाऱ्यावर आनले अब्दालीला पुढे जाण्यापासून रोकण्यात सखरोजी पाटील सातशे स्वारांच्या पथका समवेत होता पण अब्दालीच्या सैनिकांपुढे सरखोजी पाठलांच्या सैनिकांचा निभाव लागला नाही सखरोजी पाटिल आपल्या सैनिकांसह शहीद झाला २७ ऑक्टोंबला अहमदशहा अब्दाली आपल्या सैनिकांस सोनीपत संबलकाला येऊन धडकला. सदाशिवराव भाऊचे पायापासून दळणवळण तुटले. अहमदशहा अब्दालीने आफगाण सैनिकांसह यमुना नदी ओलांडल्याचे कूरूक्षेत्राच्या मार्गावर असणाऱ्या सदाशिवराव भाऊंच्या लक्षात आल्यावर भाऊंनी अहमदशहा अब्दालीस शह देण्यासाठी आपली छावणी माघारी वळत पानिपत जवळ आपली छावणी टाकली व बचाव भक्कम करण्यावर जोर दिला आणि बाजी हरीला पाच हजार सैनिकांस अहमदशहा अब्दालीचा मागोवा घेण्यासाठी पाठविले बाजी हरीचे सैन्य थकले होते थकवा दुर करण्यासाठी विश्रांती घेत असताना झोपलेल्या सैनिकांवर अब्दालीचा सेनापती शाह पसंत खान याने हाल्ला केला ज्यामुळे मराठयांच्या सैनिकांना जिव गमवावा लागला व मालमत्तेचे नुकसान ही झाले. यानंतर अब्दालीने मराठ्यांचा दक्षिणेत जाण्याचा रस्ता रोखला व मराठयांचा दिल्लीशी संपर्क तूटला. २८ ऑक्टोबर रोजी दोन्ही फौजांच्या आघाडीची चकमक होऊन दोन्ही फौजा मागे सरल्या. पानिपत गावाभोवती तोफखाना पसरून भाऊने छावणी केली. अहमदशहा अबदालीने त्याच्या दक्षिणेस ५-७ किलोमीटरवर आपला मुक्काम ठोकला.
पानिपतनजीक सभोवताली मराठी फौजानी खंदक खणून सभोवताली आराबा पसरून, अफगणांशी सामना करण्याकरिता शत्रूच्या रोखाने तोफा लावून, भोवती खंदक खणून त्यांत यमुनेच्या कालव्याचे पाणी सोडण्यात आले. किल्ल्यागत छावणी बंदिस्त करून भाऊ शत्रूच्या हल्ल्याची वाट पाहत राहिला. आपल्या तटबंदीच्या आत राहून तोफांच्या माऱ्याने शत्रूचा धुव्वा उडवून देऊ, अशी योजना भाऊने आखली. पुढून हल्ला आल्यास आपला तोफखाना शत्रूचा चांगला समाचार घेईल, अशी भाऊची खात्री होती. शत्रूची रसद तोडण्याची आणि दुआबातील त्याच्या मुलखांत दंगल माजविण्याची कामगिरी भाऊने गोविंदपंत बुंदेले, गोपाळराव बर्वे यांजकडे सोपविली. आपण आपल्या बंदिस्त छावणीत दोन-तीन महिने सहज निभवून नेऊ, तोपर्यंत पुण्याहून आणखी फौज आपल्या मदतीस येऊन दिल्लीच्या बाजूने पाठाणांस शह देईल, असाही त्याचा अंदाज असावा पण भाऊच्या या योजना फोल ठरल्या.
३१ ऑक्टोबर १७६० ला मराठे आणि अब्दाली अगदी समीप येऊन ठेपले होते. मात्र मराठ्यांनी तोफखान्याच्या केलेल्या रचनेमुळे आपला सहज धुव्वा उडेल असं अहमदशहा अब्दालीच्या लक्षात आलं होतं. अहमदशहा अबदाली मोठा अनुभवी आणि कुशल सेनानी होता. त्याने आपली फौज थोडी मागे घेतली आणि परिस्थितीचे निरीक्षण चालविले. सुरुवातीला त्याच्या फौजेत रसदेची व्यवस्था नव्हती त्यामुळे साहजिकच धान्याची कमतरता वाढली. आफगाण फौजेच्या (गिलच्यांच्या) लष्करातील या बातम्या भाऊकडे येत होत्या. त्याचा अर्थ त्याने वेगळाच केला. १ नोव्हेंबर रोजी भाऊने गोविंदपंतास लिहिले, ‘फार आवळून चालतात, काही लांबवू देत नाहीत. चाळीस-पन्नास कोस धावतात ते नाही. दाणा दोनअडीच शेर गिलच्यांच्या लष्करात आहे. हिंमत फार आहे. यास गिळणार’. सेनापतीची ही आत्मविश्वासाची भावना इतरांच्या पत्रांतही व्यक्त होते. मराठी फौजेत असलेला कृष्ण जोशी यासंबंधी आपल्या भावास तपशीलवार लिहितो. या पत्रात दोन्ही बाजूंकडील एकूण परिस्थितीचे सम्यक दर्शन घडते.
२२ नोव्हेंबर १७६० रोजी वजीर शहावलीखानाशी झालेले युद्ध निर्णायक ठरले असते. जनकोजी शिंदे-होळकरांनी अफगानी फौज अक्षरश: कापुन काढली. सुजा व नजीब खानाने अधिकची कुमक पाठवुनही वजीराला व त्याच्या सैन्याला पळ काडावा लागला. शिंदे-होळकरांच्या फौजांनी त्यांचा पार आफगाणांच्या छावणीपर्यंत पाठलाग केला. पळूण आलेल्या आपल्याच लष्कराची ही अवस्था पाहुन छावणीतील अफगान-रोहिल्यांनीही पळ काढायला सुरुवात केली. खरे तर या वेळीस लगोलग बळवंतराव मेहंदळे (जे काही अंतरावर ससैन्य उभे राहुन हा प्रकार पाहत होते) अथवा अन्य कोणी मराठा सरदारांनी कुमक ससैन्य मदतिला पाठविले असते तर… पानीपतचा इतिहास बदलन्यास वेळ लागला नसता.
पंधरा दिवसांनी ०७ डिसेंबर १७६० अमावश्याच्या रात्री अजून एका चकमकीमध्ये गोविंदपंत बुंदेलेंच्या सैन्य-तुकडीवर अब्दालीच्या नजीबखान कडील पाच-सात हजार रोहिले अचानक चालून आले. रोहिल्यांच्या बंदुकांच्या माऱ्यापुढे या मराठ्यांच्या तुकडीला माघार घ्यावी लागली. पळणाऱ्या राऊतांना थोपविण्याकरिता पुढे झालेल्या बळवंतराव मेहेंदळे यास शत्रूकडील एक गोळी लागून तो घोड्याखाली आला व मरण पावला.बळवंतराव मेहंदळे यांची ही तुकडी मुख्य सेनेसाठी रसद व घोडदळीची कुमक आणत होती. बळवंतराव मेहंदळे केवळ भाऊचा उजवा हात, त्याच्या मृत्यूने साहजिकच मराठी लष्करात निराशेची छाया पसरली. मेहेंदळ्याच्या मृत्यूने या मोहिमेस एक अनिष्ट कलाटणी दिली असे म्हटले पाहिजे. या वेळेपर्यंत मराठी फौजांचे मनोधैर्य कायम होते पण आता ते खजले. शत्रू आपल्या गोटात येऊन शिरतो आणि बलवंतरावासारखा मातबर सरदार कामास येतो, हे पाहून या फौजांनी धास्त खाल्ली. बाहेर कोणी पडेनासे झाले.
यमुना नदी पार करून मराठ्यांना अन्न धान्याची रसद वाहतूक पुरविणाऱ्या मराठयांच्या सैनिकांना अब्दालीच्या सैनिकांनी १६ आणि १७ डिसेंबरला ताब्यात घेतले.
मराठ्यांना अन्नधान्याची रसद पुरविणारे गोविंदपंत बुंदेले यांचा अब्दालीचा सेनापती अटलखान ने २० डिसेंबर १७६० रोजी गाझियाबाद ते मेरठ दरम्यानच्या जलालाबाद मध्ये पाठलाग करून ठार मारले मराठ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले २२ डिसेंबर १७६० ला कृष्णाराव भल्लाळ भाऊंकडे एक लाख रूपये घेऊन कसेबसे पोहचले पण ०२ जानेवारीला १७६१ला रसद घेऊन जाणाऱ्या पारसदारांच्या सैनिकांना अब्दालीने पकडले व ठार केले अशा पद्धतीने रसदेचा पुरवठा अब्दालीने पूर्णपणे तोडून टाकला. मराठ्यांची उपासमार होऊ लागली. अन्नधान्याच्या कमतरतेमुळे मोठमोठ्या मराठा सरदारांची व सैनिकांची उपासमार होऊ लागली कुंजपुरा शत्रूने परत घेतला. कर्णाल, पतियाळा बाजूने येणारी रसद तुटली. शत्रूच्या वेढ्याचे पाश मराठी फौजांभोवती घट्ट होऊ लागले. वेढलेल्या मराठी फौजांभोवती दुराणीने रात्रंदिवस गस्त सुरू केली. जनावरांचे हाल होऊ लागले. काही जमा करण्याकरता एका रात्री काही पेंढारी जवळच्या रानात गेले असता गिलच्याने त्यांना कापून काढले. दिल्लीहून खजिना रवाना झाला, तोही मधल्यामधे गारद झाला. बाहेरील जगाशी संबंध पार तुटला व सर्व लोकांची उपासमार होण्याची वेळ आली.
दोन्ही बाजुनी मोठ्या प्रमाणावर सैन्य मारले गेले. मराठ्यांना व अब्दालीलाही या चकमकीमुळे मागे हटावे लागले व दोघांनाही एकमेकांच्या सामर्थ्याचा अंदाज आला. युद्ध झालेच तर ते भीषणच होइल व प्रचंड जिवीतहानी होइल हे निश्चित झाले. मराठ्यांचा राग अहमदशहा अब्दाली पेक्षा नजीब खानवर जास्त होता. एका चकमकीत नजीब खान मरता मरता वाचला. नजिब खानाचेही ३००० पेक्षा जास्त सैन्य नुसत्या चकमकींमध्ये मारले गेले होते. अब्दालीला मराठ्याच्या सामर्थ्याचा अंदाज आलेलाच होता व युद्ध फायद्यात नाही हे लक्षात आले होते. पुढे पानिपतावर महिना-दोन महिने ज्या काही लहान सहान चकमकी झाल्या त्यामध्ये इब्राहिमखान गारदी व त्यांच्या गारद्धांच्या सैनिकांनी आणि तोफखानांनी चांगलाच पराक्रम गाजवला होता.
लहान सहान का होईना पण या युद्धामुळे अहमदशहा अब्दालीची चांगलीच क्षती झाल्यामुळे तो चिंताचुर झाला तर इकडे पानिपत मध्ये पडलेल्या दुष्काळामुळे मराठ्यांना राशन इतर जिवन उपयोगी वस्तुंचा अभाव पडू लागला. रसद पुरवठा खंडीत झाल्यामुळे सैन्याचा उपास घडु लागला. त्यात मराठ्यांची प्रचंड जिवीत हानी होऊ लागली.यामुळे मराठ्यांना आजूबाजूच्या गावांमधून अन्न धान्य उचलण्याशिवाय पर्याय राहिला नाही. यामुळे स्थानिक नागरिकांचा मराठ्यांवरील रोष वाढला. याउलट अब्दालीला दक्षिणेकडील मित्र पक्षांकडून रसद पुरवठा होत राहिला.
मराठयांशी युद्धाची तयारी करीत आसताना अहमदशाह अब्दालीस ज्या अडचणी येत होत्या त्या अडचणींमुळे त्याला कळून चुकलं होत कि या युद्धात आपला निभाव लागणे अवघड होऊन बसेल म्हणुन अहमदशाह अब्दालीने मराठयांचा सेनापती पेशवा सदाशिवराव भाऊला संधेश पाठविला कि आपण पंजाबच्या शिमेला अंतिम शिमा समजत असचाल तर मी तूमच्याशी युद्धा ऐवजी तह (संधी) करून माघारी आफगाणला जायला तयार आहे. परंतु सदाशिवराव भाऊंनी असे सांगुन हा संधेश धुडकावून लावला कि भारताच्या सिमा अटक पर्यंत आहेत.
अहमदशहा अब्दालीची मोठी पंचाईत झाली त्याला वाटले भविष्यात मराठे आपल्या राज्याजवळ येतील व एक ना एक दिवस आपल्या राज्यावर आक्रमण करतील आपला प्रदेश बळकातील असे समजु लागला. युद्धा शिवाय पर्याय नाही असे अब्दालीला कळून चुकले त्याने उत्तरेतिल मुस्लिम राजांना मदतीची हाक मारली. आफगाणच्या झेंड्याखाली उत्तरेकडील (जोधपुर व जयपुरचे हिंदू राजे) अब्दालीस मदत करण्यास एकत्र येऊ लागले होते. तर त्याचवेळी उत्तर भारतातील मराठ्यांच्या सरदारांनी या अगोदर उत्तर भारतात अवलंबिलेल्या चुकिच्या धोरणामुळे तेथिल रयतेने व मुस्लिम राजांनी मराठ्यांना मदत न करण्याचे ठरविले पण त्याच वेळेस मराठ्यांच्या सेनेत असलेला मुस्लिम इब्राहिमखान गारदी मराठयांच्या बाजूने भक्कमपणे पाठीशी उभा होता पानिपत युद्धापुर्वी अहमदशहा अब्दाली मराठ्यांच्या ताकतीचे आकलन करीत होता त्या वेळीस अब्दालीस इब्राहीम खान गारदि विषयी माहिती मिळाली इब्राहीम गारदी मराठयांच्या तोफखान्यांचा कुशल सेनापती व मराठयांचा महत्वपूर्ण सरदारांपैकी मुख्य सरदार होता त्यालाही नाजिब खान रोहिल्याच्या मार्फत अहमदशाह अब्दालीने फोडण्याचा प्रयत्न केला होता. मराठ्यांनी अब्दालीचा अफगाणिस्तानला जाण्याचा मार्ग रोखला होता तर अब्दालीने मराठ्यांचा दिल्ली मार्ग रोखला होता. मराठे पानिपतच्या उत्तरेकडे होते व त्यांचा मार्ग दक्षिणेकडे होता. मराठयांचे मित्र पक्ष, त्यांचे रसद पुरवठादार, सैन्य कुमक हे सर्व दिल्लीच्या दक्षिणेकडे होते. तर अब्दाली पानिपतच्या दक्षिणेकडे होता. अशीच एकदम विरुद्ध स्थिती अब्दालीचीही होती. मराठ्यानी व अब्दालीने एकमेकांचा रस्ता आडवला होता एकमेकांचे वैर्य लक्षात घेता युद्ध किंवा संधी असे दोनच विकल्प होते. अब्दाली पानिपतवर मराठ्यांच्या रस्त्यात आडवा आला, तेव्हा त्याची कोंडी फोडण्यासाठी युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. तेव्हा भाऊसाहेबांनी इब्राहिमखानास मसलतीस बोलवले. त्या वेळी त्याने सांगितले की, ‘तुमचे आमचे इमान प्रमाण झाले तेच करार आहे, आमचे गैर इमान असते तरी प्रत्यय दाखवतो, म्हणून त्याने दुराणी व नजीबखान रोहिला, सिराजदौला यांची २५ पत्रे दाखवली की, तुम्ही आम्ही एक जात आहो. यासमयी आमच्याकडे यावे म्हणजे तुम्हास पंचवीस लक्षाचा मुलूख देऊ. उमरावीही देऊ.ʼ ती पत्रे भाऊसाहेबांनी वाचून पाहिली, तेव्हा सदाशिवराव भाऊंना इब्राहिमखान गारदीच्या प्रामाणिकपणाविषयी खातरी झाली.
पानिपतच्या युद्धप्रसंगी सदाशिवराव भाऊ व इब्राहिमखान गारदी यांच्यात झालेले महत्त्वपूर्ण संवाद भाऊसाहेबांच्या बखरीत दिले आहेत. भाऊसाहेब म्हणाले की, आमचा तुमच्यावर विश्वास आहे, परंतु येथून दिल्लीत पोहोचण्यासाठी काय करावे लागेल आणि ते कसे साध्य होईल? त्यावर इब्राहिमखान गारदीने उत्तर दिले की, गोल बांधून लढाई करावी आणि त्यामध्ये बुणगे स्त्रिया घालून भोवती मोठे मातब्बर सरदार ठेवून सर्वांना त्यांच्या बाजू वाटून द्याव्यात आणि दोन कोस लढत दिल्लीत पोचावे…गारद्यांच्या पलटणीची शत्रुपक्षावर हल्ला करण्याची पद्धत ब्रिटीश अथवा फ्रेंच सैनिकांप्रमाणे होती. पुढे जाणाऱ्या पायदळाला मागून धडाडणाऱ्या तोफांचे संरक्षण मिळत असे. जेव्हा पायदळ सेना शत्रूजवळ पोहोचे तेव्हा तोफा थांबून पायदळ सैनिक शत्रुंवर बंदूकीने हल्ला करत असत आणि जेव्हा समोरची ( शत्रुपक्षांची) फौज एकदम जवळ येई त्यावेळेस तलवार, भाला या पारंपारिक शस्त्रांनी शत्रूवर हल्ला चढवण्यात येई. गोलाची लढाई करण्यात गारद्यांचे सैन्य निपुण होते.


१४ जानेवारी १७६१ बुधवार चा दिवस उजाडला अखेर या दिवशी लढाईचा पवित्रा घेत पेशवा सेनापती सदाशिवराव भाऊंनी पानिपत मध्ये लढाईचा शंख फुंकला. ठरविल्याप्रमाणे प्रत्येकाला आप आपल्या जागा योजून दिल्या होत्या. इब्राहिमखान गारदी तोफखाना घेऊन आघाडीस होता. त्याच्या उजवीकडे शिंदे आणि होळकर होते, तर डावीकडे विठ्ठल शिवदेव, यशवंत पवार, अंताजी माणकेश्वर, दमाजी आणि गायकवाड हे सरदार होते. पानिपतच्या आग्नेयेस तीन मैलांवर उग्रखेडीच्या पुढे निंबडीच्या दक्षिणेस म्हणजेच मराठा सैन्याच्या डाव्या बाजुस आपल्या गारद्यांच्या पलटणी (सैनिकांसह) इब्राहिमखान गारदी जाऊन उभा राहिला होता. इब्राहिम खान गारद्यांच्या समोरच पुर्वीकडे आफगाण सैन्यातील मित्रपक्षाच्या रोहिल्यांची टुकड़ी मराठ्यांचा मुकाबला करण्यासाठी तयारितच होती. सदाशिवरावभाउंनी विट्ठल विंचुरकर ( १५००० घोडदळ) आणि दामाजी गायकवाड़ (२५००० घोडदळ) तोफखान्याच्या मदतीला ठेवले होते. ही रिझर्व सेना होती. सकाळच्या नऊ दहा वाजता प्रत्यक्षात युद्धास सुरूवात झाली. इब्राहिम खान गारदी ने तोपचींना इशारा केला तोफखान्यांच्या वाता पेटवण्यात आल्या, वाती सर-सर करत जळू लागल्या तोफांतून चिंगाऱ्या निघू लागल्या आणि तोफा धडाडू लागल्या तोफगोळे शत्रु सैन्यावर जाऊन पडू लागले आणि रोहिल्यांच्या सैनिकांचे मुडदे हवेमध्ये उछलु लागले. युद्ध पेटले गेले जगाच्या इतिहासातिल एक महासंग्राम आरंभ झाला. चारी दिशा ने कोहराम माजला गेला. अफगानांच्या आक्रमणाचा धुराळा उड़वला जात होता माणसांच्या तुटलेल्या हातापायांच्या राशी पडत होत्या. इब्राहीम खान गारद्याच्या तोफांनी रोहिल्यांची दयनीय अवस्था करुण टाकली जवळ जवळ १२००० रोहिल्यांचे सैनिक ठार झाले. दुपारपर्यंत मराठ्यांनी आपली पकड मजबुत ठेवत लढाईत वर्चस्व मिळविल्यामुळे इब्राहिमखान गारदीला आभाळाएवढी खुशी झाली. मराठी तोफखान्याने ओकलेल्या ज्वालामुखीपुढे शत्रु सैन्याची पार वाट लागायला लागली. तोफांतून निघणारे तोफगोळेे शत्रुपक्षांवर सटिक मार करित आसल्याने अहमदशहा अब्दालीच्या मित्र सेनेतील रोहिल्यांच्या तुकडीत भगदाड पडले तेव्हा रोहिल्यांचे सैन्य जीव वाचवण्यासाठी रणभुमि सोडून पळून जाऊ लागले. याच वेळी काही मराठा सरदारांनी उतावळेपणा करीत ठरविलेल्या योजनेविरुद्ध पाऊले टाकत नामुष्की ओढवून घेतली त्यांच्यापैकीच विठ्ठल शिवदेव व दमाजी गायकवाड या सरदारांना रहावले नाही त्यांनी अतिउत्साहात आपले धैर्य गमावले. एकच कालवा आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले ते पाहून इब्राहिम खान गारदीने मागे वळून पाहिले तर तो भितिने कापु लागला कारण त्याच्या मागे संरक्षणार्थ असणाऱ्या टुकड्यांनी गोलाईच्या युद्धाची रचना तोडून एकाकी पुढे निघुन जाऊ लागले इब्राहीन खान गारदीने जिव तोडून आकांताने ओरडून सांगत त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला पण त्याचे कोणीही ऐकले नाही. आणि मराठ्यांचे सैन्य रणभुमित घुसुले. या उतावीळ सरदारांनी आणि त्यांच्या सैनिकांनी अति उत्साहामध्ये येऊन रण मैदानात घुसले कारण त्यांना पण या ऐतिहासिक युद्धामध्ये योगदान दिले नाही तर अपमान होईल असे समजून पळूण जाणाऱ्या रोहिल्यांचा पिछा करण्यासाठी गोलाई तोडून तोफांना ओलांडून रणांगणात घुसले. मराठा सैनिकांना व त्यांच्या सरदारांना गोलाच्या लड़ाईचा अनुभव नव्हता त्यामुळे हे सैनिक गोलाई च्या लडाईचे पालन करण्याच्या मनस्थितीत नव्हते. तोफखाना यांच्या पाठीशी राहिला. आता मात्र इब्राहिमखान गारदीची मोठी पंचाईत झाली “तोफगोळे सोडावेत तरी कोणावर परकिय शत्रुपक्षावर कि आपल्याच सैन्यातून रणमैदानात उडी घेतलेल्या स्वकिय सैनिकांवर” त्यामुळे पुढे गेलेली आपली माणसे मृत्युमुखी पडतील, या भीतीमुळे इब्राहिमखान गारदीने तोफा डागणे बंद केले. तोफा डागणे बंद झाल्यामुळे रोहिल्यांच्या सैनिकांनी मागे वळून आश्चर्याने पाहिले आणि त्यांना दिसुन आले कि हजारोंच्या संख्येने मराठा घोडदळ आणि पायदळ सैनिक आपला पिछा करण्यास येत आहेत त्यांच्या जवळ तलवारी व पारंपारिक हत्यारेच आहेत हे पाहून रोहिला रायफल्समॅन घुडसवारांनी मराठा सैनिकांना दुरूनच निशाणा धरून टिपण्यास सुरूवात केली. या सैनिकांना बॅकअप देण्यासाठी उजव्या बाजूला होळकर आणि सिंधीयाचे सैनिक होते यांनी काही वेळेसाठी तटस्थ भुमिका घेतली होती यांच्यावर अहमदशहा अब्दालीच्या रोहिले आणि अवधच्या सैनिकांनी आक्रमण करण्यास सुरुवात केली इथून पुढे मात्र लड़ाईचा रंग बदलला मराठ्यांनी आपल्या सैन्याची वाताहत केलेली पाहूण अहमदशाह अब्दालीने आपल्या राखीव सेनेचा हुकमी पत्ता काढला १५००० कसलेले नव्या दमाचे (न थकलेले) योद्धे त्यांच्या मागे बंदुकधारी घोडदळ व उंटावर लादलेल्या छोटया तोफा बाहेर काढल्या व मराठ्यांवर चाल केली. उंटावर लादलेल्या छोटया तोफा पानिपतच्या युद्धात निर्णायक ठरल्या या तोफा मराठ्यांच्या घोडदळाविरुद्ध अतिशय परिणामकारक ठरल्या, तसेच मराठ्यांचे घोडदळ अफगाणी बंदुकधाऱ्यांपुढे टिकाव धरू शकले नाहीत.
अखेरच्या टप्प्यात मराठ्यांच्या शिंदे तुकडीने नजीब वर हल्ला केला. नजीब यशस्वीरित्या एक बचावात्मक लढा देत राहिला.
अफगाण सैन्याची डावी तुकडी अभेद्य होती त्यांच्या मध्यभागी सदाशिवरावभाऊंनी अफगाण सैन्याला खिंडार पाडले. सदाशिवराव भाऊ यांना आपली (फळी) बाजु ढासळताना दिसत असल्याने आणि विश्वासराव लढाईत गायब झाल्याने त्यांनी हत्तीवरून उतरून स्वतः रणमैदानात लढू लागले. त्यांनी उजवीकडचे सैन्य जवळजवळ नष्ट केले होते. परंतु मराठ्यांचे कित्येक दिवस भुकेने व्याकुळलेले सैन्य कोलमडू लागले.
शहावली ने मराठा सैनिकांच्या मोर्चा वर हमला केला त्यामुळे मराठा सैनीक रक्षा हीन झाले आणि एक एक करुण रणांगणावर पडू लागले.या घटनेवरूण लक्षात येईल कि मराठा सरदार आणि सैन्य आपल्याच तोफखान्याबरोबर असणारी पायदळ सेना आणि घोडदळसेने सोबत सामजस्य साधु शकले नाहीत. गोलाच्या युद्धात फसलेल्या आफगाणी सैनिकांनी गोलाईच्या युद्धातून बाहेर निघुन मराठा सैनिकांच्या केंद्रास घेरण्यास सुरु केले. अशातच पेशव्यांचे सुपुत्र विश्वासराव यांच्या डोक्याला गोळी लागुण ठार झाले व सर्वत्र गोंधळाचे वातावरण तयार झाले. विश्वासरावांच्या पडण्याने मराठा सैन्य पार गळून पडले. विश्वासराव पडल्याचे कळताच सदाशिवरावभाऊ पेशवा धुमश्चक्रिमध्ये नाहीशे झाले. त्यांच्या सोबत पुढे काय झाले याचे कोणालाच काही माहिती नाही. आपला पराभव झाला असे समजुन सैनिक व बाजार बुणग्यांनी पळ काढला.
पानिपच्या तिसऱ्या लढाईत देखील इब्राहीमखानच्या गारदी तुकडीने आपल्या बरकंदाज व शिलेदारांसह शेवटपर्यंत गोलाच्या लढाईच्या स्वरूपात जहाल हल्ले चालू ठेवले. परंतु मराठा रियासातीचे जुने मात्तबर सरदारांना हि पद्धत मान्य नव्हती. त्यांनी गारद्यांचा तोफखाना आणि बंदुकदल कार्यरत असतांनाच भर मैदानात उडी घेतली. पानिपतावर अखेरीस गोलाच्या लढाईत इब्राहिमखानाने आपल्याकडून अत्यंत शिकस्त करूनही उपयोग झाला नाही त्यांची संपुर्ण मेहनत मातीत मिळाली. इब्राहिम खान गारदीच्या तोफखान्यावर सदाशिवराव भाऊंचा फार विश्वास होता. पण सैन्य एकत्रित नसल्याने कोणाचीच कोणाला मदत होत नव्हती. सैन्य समोर व तोफखाना मागे अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे तोफखाना बंद पाडवा लागला. मराठयांजवळ तोफखाना असुनही त्याचा काही उपयोग करुण घेता येत नव्हता. हजारो मराठे मारले जात होते. समोर पराभव दिसु लागल्यावर मोठमोठ्या सरदारांनी देखील माघार घेतली. याआधीच एक बाजु सांभाळणाऱ्या होळकर यांना युद्धाच्या परिणामांची जाणीव झाली त्यांनी पानीपतच्या रणभुमितून काढता पाय घेतला आपले सैन्य वाचवले. अखेर मराठ्यांचा या लढाईत पराभव झाला. मल्हारराव होळकर यांनी जवळपास १५,००० सैनिक घेत ग्वाल्हेर गाठले. त्यात सदाशिवराव भाऊ यांच्या पत्नी पार्वती यांना वाचवण्यात ते यशस्वी झाले. मात्र इब्राहीम खान गारदी व त्याचे गारदी सैनिकांनी आफगाणि सैनिकांचा शेवटपर्यंत जोमाने मुकाबला करित होते अफगाणी सैनिकांना इब्राहिम खान गारद्यांच्या गारदी बटालियनवर विजय मिळवणे कठीण होत चालले होते. दुपार नंतरच्या कालावधीत मराठ्यांच्या मुख्य सैन्याने पळ काढण्यास सुरुवात केली होती तरी गारद्यांनी अफगाण्यांशी झुंज चालू ठेवली. एक एक करीत हे गारदी पडत होते व दुपारनंतर गारद्यांची संपूर्ण तुकडी नेस्तनाबूद होत आली होती. उरले सुरले गारदे अंधार झाला तरी एकाकी लड़त होते. जे जिवंत राहिले त्या मोजक्या गारद्यांनी पहाटेच्या अंधारात माघार घेतली. अहमदशाह अब्दाली च्या सेनेने इब्राहीम खान गारदी चे पाच हजार गारदी कापून काढले होते. त्यामध्ये इब्राहिमखानाचा पुत्र व भाचा मारला गेला.इब्राहीमखानला गारदीला रोहिल्यांच्या सैनिकांनी जिवंत पकडले मराठा सरदारांपैकी अनेकांनी या लढाईत माघार पत्करुन पुणे गाठले पण इब्राहीमखानने आपल्या देशासाठी शेवटपर्यंत मृत्युशी झुंज दिली.इब्राहिमखान जखमी अवस्थेत सापडला. तेव्हा अहमदशहा अब्दालीने त्याला विचारले, तू माझा जात भाई असताना मला का सामील झाला नाहीस? तेव्हा इब्राहिमखान गारदी ने सांगितले की, ज्यांच्याशी मी अगोदरच नोकरीचा करार केला तो करार संपुष्टात येणार नव्हता तो पर्यंत मी माझ्या माणसांवर दगाफटका करू शकणार नव्हतो. जातीसाठी माती खाणारा मी गारदी नाही. मी मराठ्यांना वचन दिले होते ते पाळणे सर्वांत महत्त्वाचे होते. ते वचन मोडून त्यांचा दगा करणे माझ्या तत्त्वात बसणारे नव्हते. हे ऐकल्यावर अहमदशाह अब्दालीने इब्राहिमखान गारदीस ठार करण्याचा हुकूम दिला अहमदशाह अब्दालीच्या सैन्याने इब्राहिमखान गारदीस हालहाल करूण ठार मारले आणि एका शूराचा अंत झाला. पानिपतच्या युद्धामुळे मराठ्यांचा कणाच मोडला. लाखो घरे उधवस्त झाली पिढीच्या पिढी नष्ट झाली. दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या, लाख बांगडी फुटली आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणतीच नाही, असं या लढाईचं वर्णन केलं गेलं.पानिपतच्या युद्धात हिंदु मुस्लिम एकतेचे प्रतिक बनलेल्या व मातृभुमि साठी लढ़ा देऊन आपले प्राण अर्पण करणाऱ्या विर जवानांच्या पराक्रमाचा सार्थ अभिमान असायला हवा.
पारधी समाजात अजूनही इब्राहीमखान, फत्तेखान व सुलेमानखान गारद्यांच्या शौर्याबद्दलच्या विराण्या गायल्या जातात. गारदी हे त्यांच्या इमानासाठी प्रसिद्ध होते. त्यांच्यातले हे गुण ओळखूनच मराठा सैन्यात दाखल करून घेतले. सुमारे २६० वर्षांपूर्वी दळणवळणाची साधनं मर्यादित असताना लाखभर माणसं, प्रतिकूल हवामान आणि तुल्यबळ प्रतिस्पर्धी यांना टक्कर देत इब्राहीम खान गारद्यांनी दिलेली लढत इतिहासाच्या पानांमधलं एक धगधगतं पर्व राहील.
मराठेशाही पानिपत मधील तिसऱ्या लढाई हरले असले तरी ती लढाई अनिर्णितच राहिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. कारण पराभव झाल्यानंतर पराभूत बाजूची भूमी व आर्थिक हक्क लढाई जिंकणाऱ्याच्या ताब्यात जातात. पण पानिपतच्या तिसऱ्या लढाईत तसे झाले नाही! याउलट आफगाणिस्थानचा शहंशाह आहमदशहा अब्दाली लड़ाई जिंकूण सुद्धा भारतात न राहता अफगाणीस्थानला निघून गेला आणि अफगाणिस्तानात जाऊन त्याने नानासाहेब पेशव्यांना माफीनामा सादर केला!
विशेष सुचना:- वरिल सर्व माहीती विविध वर्तमानपत्रे, पुस्तके, आणि इतर मजकूर व बातम्या अशा माध्यमातून लोकमाहितीस्तव संपादित केलेली असून सदर माहिती जमा करीत आसताना या मध्ये तफावत अथवा मतभेद असण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपण आपल्या सुचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधावा. rohidasshivajimalage3@gmail.com
Mobile No:- 9604939252
-®रोशिम.✍️