

मि तुम्हाला देश भक्तिचे प्रमाणपत्र वाटण्यास आलेलो नाही.
पण जे स्वतःला एकरंगा झेंडयाचे कट्टर पुरस्कारकर्ते समजत होते ते तिरंगा झेंडयाचा प्रचार आणि प्रसार करू लागलेत त्यामुळे त्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन !
जे मानतात की आमचा देश २०१४ ला स्वातंत्र झाला आहे. आणि आता भारत देशाचा अमृतमहोत्सव साजरा करण्यास सज्ज झालेले आहेत आणि दूसऱ्यांना अमृतमहोत्सव साजरा करण्यास सांगत आहेत त्या सर्वांचे हार्दीक अभिनंदन !
देश स्वतंत्र झाल्यापासुन ज्यांच्या शाखेने आपल्या ऑफीसमध्ये कधीही तिरंगा फडकविला नाही ज्यांनी तिरंगाचा सतत विरोध केला ते आज देशाला तिरंगा फडकविण्यास पुरस्कृत करीत आहेत त्याबद्दल त्या सर्वांचे हार्दीक अभिनंदन !
या देशात राहतात खातात-पितात आणि या देशाच्या मातीत श्वास सोडतात तरी ते आपआपल्या घरांवरती देशाचा झेंडा फडकविण्यास संकोच करतात शोसल मिडियावरती, DP वरती तिरंग्याचा फोटो ठेवण्यास स्वतःचा कमीपणा समजतात तरी पण आम्ही भारत देशावर प्रेम करतो असे म्हणतात त्या सर्व भारतीयांचे हार्दीक अभिनंदन !
-®रोशिम.✍️