आज धुलीवंदन आजच्या दिवशी मंबाजी भट आणि सालोमालो भट व कंपूने तुकाराम महाराजांची हत्या केली आणि इंद्रायणी नदीत  महाराजांचा देह सोडून दिला अन नंतर अशी आवई उठवली कि महाराज सदेह वैकुंठाला निघून गेले.                              इंद्रायणीच्या डोहात रडले मासे सांगा ओ सांगा वैकुंठीचे विमान कसे होते ????                                  व सतराव्या शतकात विमान येणे व त्याचा चालक  गरूड होता यावर कोणत्याही जिवंत माणसाचा  विश्वास बसणार नाही  …!!!!           तुकाराम महाराज यांची हत्या करताना पांडू मांग नावाच्या तरुणाने बघीतली होती. गावात येवून त्याने तुकारामांच्या पत्नीला सांगितलं होते. पण भटांनी आवई उठवली महाराज वैकूंठाला गेले बरे गेलेच असे समजले तरी ते एकादशीे सारख्या पवित्र दिवशी न जाता धुलवडीला अभद्र दिवशी का गेले होते ?    ते विमान वैकूंठावरून  आले होत म्हणेे  मग आतापर्यंत च्या इतिहासात एकदाच का आले ?                    मग आता काय त्याची फेरी बंद पडली का ?                                कि वैमानिक फरार आहे ?           बरे आपण मानले तुकाराम महाराज वैकूंठाला गेले मान्य आहे मग सर्व जगात बोलबाला व्हायला पाहीजे होता. एकाही बामणाच्या तोंडात तुकाराम महाराजांचे नाव का येत नाही?    किती ब्राह्मण देह

संत तुकाराम यांचा खून का झाला?

१. वैदिक पंडितांचे वर्चस्व असलेली जीवनपध्दती व धार्मिक व्यवस्था यांना जोरदार हादरे बसतील, अशा आचार विचारांचा पुरस्कार तुकाराम आपल्या अभंगांतून करीत होते.

२. तुकारामांच्या या हल्ल्यांमुळे त्या पंडितांची सामाजिक प्रतिष्ठा, समाजावरील नियंत्रण, आर्थिक उत्पन्न आणि त्यांचे एकूणच हितसंबंध यांना तडे जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यांच्या तळपायाची आग मस्तकात गेली, यात शंका नाही.

३. पिढ्यानपिढ्या पुष्ट होत असलेला त्यांचा अहंकार दुखावला गेला.

४. आपल्या हितसंबंधाच्या रक्षणासाठी तुकारामांचे तोंड बंद करणे आवश्यक आहे, असे त्यांना वाटू लागले.

५. शुद्र असल्याकारणाने वेदाचा अधिकार नसताना तुकारामांच्या तोंडून वेदवाणी बाहेर पडणे, हे पंडितांच्या पचनी पडणारे नव्हते.

६. अनेक ब्राह्मणांनी तुकारामांना गुरुपद बहाल केल्यावर पंडितांचे पित्तच खवळले. ब्राह्मण पंडित जिवंत असताना गुरुत्व एका शुद्राकडे जात आहे, हा तर त्यांच्या दृष्टीने मोठा आघात होता.

७. धर्मशास्त्रानुसार मृत्युदंड हि एकमेव शिक्षा असल्या कारणानेच तुकारामांचा खून करण्यात आला.

संत तुकारामांना सुद्धा हे लोक आपला घात करतील याची पूर्ण कल्पना होती, हि त्यांची भावना खालील अभंगांवरून स्पष्ट होते….

स. कृ. जोशी यांनी तुकारामांवरील चरित्रात्मक लघुकथेमध्ये तुकारामांच्या हत्येची शक्यता पुढीलप्रमाणे मांडली आहे,” इतक्यात गावचा मांग भिवा धावत-पळत आला. तो सांगत होता की,’ सालो मालोचे नि मंबाजीचे कपडे रक्ताने डागाळलेले त्याने पाहिले. तुकोबांना घेऊन ते जंगलात गेले होते. ते त्यांचा खून करून ही दुक्कल आली असावी”

पां. बा. कवडे यांनीही असेच मत मांडले आहे.

कवडे म्हणतात,” ‘फाल्गुन वद्य द्वितीया’ हा दिवस महाराष्ट्रातील आबालवृद्धांच्या विशेष माहितीचा असतो. या दिवसाचे ओंगळ स्वरूप जाणत नाही असा मनुष्य सापडणे अशक्य! सभ्य व समंजस माणसास ह्या दिवसाबद्दल अप्रीती असते. स्त्रियांस या दिवसाबद्दल अत्यंत तिरस्कार असतो. कारण पुरुषवर्ग माणुसकी विसरतो. लहानमोठा भेद मावळतो. मर्यादेचे उल्लंघन होते. विचार अस्थिर होतात.वाणीस धरबंध नसतो. आअपलि वागणूक माणूसकीस सोडून आहे, त्यामुळे आपल्या आयाबहीणीस किती वाईट वाटत असेल, याबद्दलचा विचार पुरुषवर्ग विसरतो. त्यामुळे स्त्रिया घराबाहेर पडणे सुद्धा मुष्कील होते. असे या द्वितीयेचे घाणेरडे व ओंगळ स्वरूळ असते……सन १९५२ मध्ये शिमग्याच्या बीभत्स आचारास आळा घालावा म्हणून मुंबईतील जाणत्या लोकांनी सरकारात अर्ज केला होता. अशा फाल्गुन महिन्यातील वद्य २ हाच दिवस देवाने तुकाराम महाराजांना वैकुंठास नेण्यासाठी निश्चित करावा व त्यासाठी अगदी सुर्योदयास विमान का पाठवावे, हा प्रश्न चिकित्सक दृष्टीच्या द्वारे मानवी मनाचे समाधान करू शकत नाही”.

ते आणखी म्हणतात,” मानवी हिताच्या वैऱ्यांनी कट करून त्यांना इंद्रायणी नदीतील डोहात ढकलून देणे शक्य आहे. अशा संधीची ते वाट पहात असतील. कारण त्या दिवशी सबंध गाव शिमग्याच्या सणामुळे बेभान झालेले. परस्परांच्या अंगावर धूळ, राख, चिखल, पाणी वगैरे टाकून थट्टा मस्करीचा रूढीहक्क बजावण्यात दंग. कोण कोणाकडे लक्ष्य देतो? शिवाय, करंजाईचे बेट हे गावापासून दोन फर्लांग लांब! गावातील धामधूम सोडून इतक्या दूरवर आपले दुष्ट कृत्य पाहण्यास कोणास सवड होणार? कदाचित झाली व पाहिलेच तर शिमग्यातील थट्टा मस्करीच्या रूढीखाली हे दुष्ट कृत्य झाकण्याचा प्रयत्न करता येईल. कारण, या दिवशी अंगावर घाण उडविणे, अगर पाणी टाकणे अथवा चिखलात किंवा पाण्यात ढकलणे हे हक्काचेच! शिवाय, असे करण्यात त्या दिवशी लहान मोठा भेद आडवा येत नसतो”.

संत तुकारामांनी वीस वर्षात भल्याभल्यांना जेरीस आणले, त्यांच्या तोंडचे पाणी पळविले, त्यांना पळता भुई थोडी केली. वैदिक पंडित, श्रोत्रिय, याज्ञिक, योगी, गुरु इ. नानाविध नावांनी व रूपांनी वावरणाऱ्या, परंतु प्रत्यक्षात भोंदुगिरी करणाऱ्या ढोंगी लोकांचे बुरखे फाडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले. अशा लोकांवर शब्दांचे कठोर हल्ले करून त्यांनी त्यांना घायाळ केले. गरीब लोकांना छळणाऱ्या टवाळ लोकांचे थोबाड फोडण्याची भाषा केली. मग्रूर आणि मस्तवाल लोकांना आव्हान दिले. आर्थिक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक इ. क्षेत्रात अत्यंत प्रस्थापित व सामर्थ्यशाली असलेल्या, पण अनीतीने वागणाऱ्या व दुबळ्यांवर अन्याय करणाऱ्या खळांची सिंहासने त्यांनी गदगदा हलवली. धर्माच्या नावावर अधर्म करणाऱ्या सर्वांवर शब्दांचे आसूड सपासप ओढले. हे करताना अन्यायी व ढोंगी लोकांचे पद, प्रतिष्ठा वा समाजातील स्थान यांची पर्वा केली नाही. दुखावल्या गेलेल्या या लोकांचा खुनशीपणा वा घातकता यांची फिकीर केली नाही. त्यांनी हा जो संघर्ष केला, तो काही एखाद दुसऱ्या व्यक्तीबरोबर केला नाही. समाजात इकडे तिकडे चोहीकडे अन्यायाचे ठेकेदार लोकांना फसवत होते, छळत होते. त्यांच्या मोठ्या संख्येची पर्वा न करता तुकाराम त्यांच्यावर तुटून पडले. त्यांनी किती लोकांचे वैर ओढवून घेतले, याला सीमा नाही. हजारो वर्षांच्या परंपरेचे बळ ज्यांना लाभले होते, अशा लोकांचे अगदी कडवे शत्रुत्व त्यांनी जाणीव पूर्वक स्वीकारले. खरेतर त्यांनी आपल्या उरावर स्वतःच्या हातांनी धगधगते निखारे ओढून घेतले. एक विध्वंसक ज्वालामुखी स्वतःच्या अंगावर खुचून घेतला. धर्माच्या ठेकेदारांना हे विचार आवडणारे नव्हते, परवडणारे नव्हते आणि याचीच परिणीती तुकारामांच्या हत्येत झाली, यात अजिबात शंका असण्याचे कारण नाही.

धुलवडी (धुलीवंदन) दिवशी तुकाराम महाराज सदेह वैकुंठात गेले अशी भाकडकथा आपण ऐकत आलो आहोत.
तुकाराम महाराजांच्या काळात लोकांनी या गोष्टीवर विश्वास ठेवला यात त्यांची काहीच चुक नाही कारण विज्ञानाशी त्यांचा दुरुनही संबंध नव्हता.आणि मंबाजींसारखे समाजातील लब्धप्रतिष्ठीत लोक खोटं कशाला बोलतील,असाही एक समज होता.
पण आजच्या काळात आपण अश्या भाकडकथांवर विश्वास ठेवणे म्हणजे या विज्ञान युगाचा अपमान करणे होय.
तुकाराम महाराजांचा धुळवडीच्या दिवशी खून झाला होता,मंबाजी व त्याच्या काही साथीदारांनी त्यांचे प्रेतही सापडू नये अशी व्यवस्था केली होती.पण महाराज गेले कोठे या प्रश्नाला काहीतरी उत्तर शोधणे भाग होते,
त्यातूनच या भाकडकथेचा जन्म झाला.यातून त्यांचा दुहेरी फायदा झाला.

1. तात्कालिक फायदा असा की खून पचला आणि त्यापेक्षाही मोठा दिर्घकालीन फायदा असा झाला की त्यांना त्या तुकारामालाही मारता आले जो त्यांच्या विचारांमध्ये जिवंत राहू शकला असता.

2. सदेह वैकुंठगमणाच्या घटनेने तुकारामांची प्रतिमा चमत्कारी बाबांची झाली आणी तेव्हाच त्यांचा खरा मृत्यू झाला.

समकालीन धुर्त लोक महान लोकांना अशाच रितीने मारण्याचा प्रयत्न करतात.आधी तर ते त्या व्यक्तीकडे लक्षच देत नाहीत,पण जेव्हा ती व्यक्ती इतकी मोठी होते की तिच्याकडे दुर्लक्ष करणं अशक्य ठरते तेव्हा ते त्या व्यक्तीवर टिकेची झोड उठवतात,त्याला परोपरीने बदनाम करण्याचा प्रयत्न करतात.(तुकाराम महाराजांकडे वेश्येला पाठवण्याचा प्रकारही याच गटात येतो.) अन् जेव्हा त्या व्यक्तीला बदनाम करणेही अशक्य होते तेव्हा ते त्या व्यक्तीचा जाहीर उदोउदो करून पद्धतशीर तिच्या विचारांना मारतात.म्हणजे ती व्यक्ती फक्त नावाला अमर होते अन् ज्या गोष्टीसाठी त्या व्यक्तीनं जन्मभर जीव जाळला ती गोष्ट तशीच राहते.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started