तो शर्यत जिंकू शकत होता परंतू त्याने समोरच्याला शर्यतीत जिंकवून दिले आणि खेळ भावनेचे उत्तम उदाहरण जगापुढे ठेवले.

(7आबेल किप्रॉप मुताई ) च्या अज्ञानतेचा फायदा घेऊन शर्यतीत पुढे न जाता आबेल मुताईला पुढे जाण्यास सांगितले (17 इव्हान फर्नाडिज )
क्रॉस कंट्रीच्या शेवटच्या टप्प्यात अंतिम रेषा पार करण्यासाठी १० मिटर अंतर अगोदरच स्पेनिस सांकेतीक साईन न समज ल्या मुळे आबेल मुताई थांबल्यावर  इव्हान फर्नाडिज ने आबेल मुताईला ढकलत धक्का देत पुढे जाण्यास सांगितले.
शर्यत संपल्या नंतर ( जर्सी नंबर 7आबेल किप्रॉप मुताई हा एक नंबर येऊन गोल्ह मिळतो तर  जर्सी नंबर 17 इव्हान फर्नाडिज अनाया हा दुसऱ्या कमांकावर येऊन रजत पदक प्राप्त करतो त्यानंतर खुशी व्यक्त करताना

इव्हान फर्नांडिझ अनाया (स्पेन ) इव्हान हा लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतो, मुख्यतः क्रॉस कंट्री आणि मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत असतो.

०२ डिसेंबर २०१२ मध्ये स्पेन देशातील नवेरा (navarra) राज्याच्या बुर्लाडा शहरात आंतराष्ट्रीय प्रतिष्ठीत क्रॉसकंट्रीची शर्यंत आयोजित केली होती त्या बुर्लाडा क्रॉसकंट्री दरम्यानचा किस्सा आहे .
(१० जानेवारी २०१३ ला सीएनए ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे )
बुर्लाडा कॉसकंट्री शर्यतीच्या अंतिम टप्प्यात आसताना  आबेल मुताई अंतीम लाईन पार करण्या अगोदरच १० मिटर इतके अंतर कमी आसताना अचानक थांबला त्याचे कारण स्पेनिस भाषेतिल (साईन Sain ,सांकेतिक चिन्ह) न समजल्या मुळे धावताना थांबला आबेल मुताईला वाटले कि तो शर्यंत जिंकलेला आहे.  अबेल किप्रॉप मुताईला वाटले की इथेच फिनिशिंग लाईनचा अंतीम टप्पा आहे. त्यातच सर्व दर्शक ओरडून आबेल मुताईला अजून धावण्यास सांगत होते तू अजून मागेच आहे अजून पुढे जा तू शर्यंत जिंकलेली नाही पण आबेल मुताई केनियायी आसल्याने व दर्शक स्पेनिस मध्ये ओरडून सांगत आसल्याने आबेल मुताईला काही कळेना त्यामुळे आबेल मुताई काही समजु शकला नाही आणि फिनिशिंग लाईन पार करण्यापुर्वी तिथेच थांबून ईकडे तिकडे पाहतच राहीला त्याचा प्रतिस्पर्धी मागोमाग काही अंतराव धावत येत होता जमतेम २० मिटर अंतरावर दुसऱ्या क्रमांकावर आसलेला इव्हान फर्नांडिझ अनाया त्या ठिकाणी पोहचला आता प्रत्येकालाच वाटत होते कि इव्हाणा फर्नाडिज अनाया आता आबेल मुताईला शर्मतित मागे सोडून पुढे जाईल व शर्यंत जिंकेल पण तसे झाले नाही हा प्रसंग इव्हाणा पर्नांडिज दुर वररूनच पाहत येत होता त्यामुळे इव्हाणा फर्नांडिज अनाया आचंबीत झाला. इव्हान फर्नांडिझ अनाया ने आबेल किप्रॉप मुताईला अजून धावण्यास ओरडून सांगत होता पण मुताई जागचा उभा राहिलेला हालेनासा झाला इव्हाना फर्नाडिज अनाया ने ओरडणाऱ्या दर्शकांकडे पाहीले तर ते दर्शक सुद्धा आबेल मुताईला अजून पुढे धावण्यास सांगत होते. इव्हान फर्नांडिझ अनाया च्या लक्षात आले की आबेल मुताईला स्पेनिस येत नसेल म्हणून इव्हान फर्नांडिझ अनाया ने आबेल मुताईला पुढे जाण्यास ढकलण्यास सुरुवात केली आबेल किप्रॉप मुताई ला पण नेमके काय चालले आहे हे उमजना पण अगदी १० मिटर पुढे गेल्यावर अंतिम लाईन पार केल्यावर आबेल मुताईला नक्की काय प्रकार झाला आहे ते समजले आबेल मुताईला गहीवरून आले आणि इव्हाना फर्नाडिजला गहीवरलेल्या अंतकरणाने कडकडून मिठ्ठी मारली

स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आसताना आबेल किप्रॉप मुताई हा पहिल्या क्रमांकावर तर इव्हान फर्नाडिज  दुसर्‍या कमांकावर धावत होते. अंतिम टप्पा पार करण्या पूर्वी दोघांच्यात खूप थोडे अंतर बाकी राहिले होते. इव्हान फर्नाडिज आबेल मुताईला मागे सोडून पुढे जाऊ शकला आसता आणि प्रथम क्रमांक मिळवू शकला असता पण इव्हान फर्नाडिज ने आबेल मुताईच्या अज्ञानतेचा गैरफायदा न घेण्याचे ठरविले आणि अशा पद्धतीने आबेल मुताई पहील्या क्रमांकावर आला. व इव्हान फर्नाडिज दुसऱ्या क्रमांकावर येऊन सुद्धा इव्हान फर्नांडेझने बुर्लाडा क्रॉस कंट्री शर्यतीदरम्यान हरवलेल्या मुताईला अंतिम रेषेकडे ढकलत असताना , आबेलमुताईला शर्यत जिंकवून दिली, व इव्हाणा फर्नाडिज व्हायरल झाला. अर्थातच या घटनेनंतर विजेत्या आबेलपेक्षा त्याला विजय बहाल करणार्‍या इव्हान फर्नाडिजचे संपूर्ण जगात कौतुक झाले. इव्हणा फर्नांडिसचे त्याच्या खेळातील कौशल्याबद्दल जागतिक स्तरावर अभिनंदन झाले. 

आबेल किप्रॉप मुताई हा लंदन ऑलिम्पिक गेम्स २०१२ मध्ये रजत पदक विजेता होता. ऑलिम्पिक खेळाडूला हारवून इन्हाना फर्नाडिजला प्रसारमाध्यमांमध्ये हाईलाईट होता आले  आसते पण त्याने तसे केले नाही

त्यानंत प्रसारर माध्यमांशी बोलताना आपल्या कृतीचे समर्थन करताना इव्हान फर्नांडिजने सांगितले की, ‘अबेल मुताई हाच स्पर्धेचा डिझर्विंग विनर होता. तो धावताना अचानपणे थांबला याचे एकमेव कारण म्हणजे त्याला स्पॅनीश भाषेतील साईन्सचा अर्थ समजला नाही.

याचा गैरफायदा घेउन मी सहजपणे त्याला मागे सोडून फिनिशिंग लाईन गाठून गोल्ड मेडल मिळवू शकलो असतो. परंतु हे क्रीडा भावनेच्या विपरीत वर्तन ठरले असते आणि ज्याचा मला आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागला असता. मी आबेलला जिंकवून देउन आपली अनेक महिने गमावू शकणारी झोप परत मिळवली आहे.’

अर्थातच इव्हान फर्नांडिजला त्या घटनेनंतर जगभरात प्रसिध्दी आणि आदर मिळाला तो विजेतेपद मिळवून कदापीही मिळाला नसता.

Leave a comment

Design a site like this with WordPress.com
Get started