रामराज्य हे फक्त नाव गोंडस आहे. पौराणिक काळात रामराज्यात शूर्पनखेचे नाक कापले गेले, सीतेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली गेली आणि ब्राम्हणाच्या खोट्या आरोपावरून शंबुक नामक शूद्राचा खून झाला. थोडक्यात स्त्री आणि शूद्र यांना कसलीही किंमत नव्हती.
मध्ययुगीन रामराज्याच्या कल्पनेत रामचरीतमानसमध्ये (जे आमच्या लहानपणी लता मंगेशकर रेडिओवर भावपूर्ण आवाजात गाऊन दाखवायच्या) स्त्रिया, दलित, अडाणी, आणि पशु हे फक्त बडवण्याच्या लायकीचे आहेत असं लिहून ठेवलंय. आजही हे रामचरीतमानस गायपट्टयात जीवनाचा आदर्श मानले जाते.
असल्या रामराज्यात राहायचं आहे तुम्हाला? की आधुनिक लोकशाहीत, संविधानावर आधारित कायद्याच्या राज्यात राहायचं आहे? स्वतःच्या बायको, पोरीकडे जाऊन चौकशी करा आणि स्वतःच्या मनाला एकदा विचारून बघा…. कायद्याचं राज्य हवं असेल तर जात-धर्म-लिंग आदी बाबतीत द्वेष करणाऱ्या कुठल्याही व्यक्ती, विचार आणि पक्ष-संघटनेसोबत उभारू नका!
– डॉ. विनय काटे