चिन्मय फडके, तन्मय कुळकर्णी व अर्थव गाडगीळ हेच नाही तर त्यांचे आजोबा-पणजोबा सुद्धा शिक्षणासाठी, नौकरी-व्यवसायासाठी 100 वर्षा आधीपासुन सातसमुद्र ओलांडून युरोप-अमेरिकेत स्थलांतरीत झालेले आहेत.ज्या काळात त्यांच्या वैदिक धर्मानुसार समुद्र पार करून जाणे हे महापाप समजल्या जात होते, त्या काळात, धर्माच्या कर्मठ परंपरांना धाब्यावर बसवुन चिन्मय, तन्मय व अर्थव चे आजोबा-पणजोबा परदेशात गेले. आता त्यांचा जवळपास अर्धा परिवार युरोप, अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, इ. ठिकाणी सेटल्ड आहे. त्यांचे काका,मामा, मावशी, आत्या असे बरेच नातेवाईक अमेरिका-युरोप मध्ये आहेत.
अमेरिकन विद्यापिठांमध्ये प्रवेशासाठी Diversity Policy (विविधता धोरण) राबविल्या जाते. म्हणजेच विद्यापिठांना वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या वंशाचे-वर्णाचे विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठात पाहिजे असतात. विद्यापीठांच्या अभ्यासानुसार व अनुभवानुसार, वर्गात असे विविधता असलेले विद्यार्थी असले कि, शिक्षणाचा दर्जा उंचावतो. असे विविधता असलेले विद्यार्थी आपल्या विद्यापिठांत यावे म्हणुन सगळे नामांकित विद्यापीठ फार उदारपणे परदेशातल्या विद्यार्थ्यांना स्काँलरशिपस्, ग्रँन्टस् देतात, ज्याच्या मदतीने विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करु शकतात. अमेरिकेतील मोठमोठे उद्योगसमुह पण विद्यापीठांना मोठमोठ्या देणग्या देतात. अमेरिकन सरकार सुद्धा विद्यापीठांना भरभरुन अनुदान देते. ह्या अमेरिकेच्या उदार शैक्षणिक धोरणाचा पुरेपुर फायदा मागच्या 100 वर्षात, जर कोणी घेतला असेल तर तो चिन्मय, तन्मय व अर्थव च्या आजोबा-पणजोबांपासून तर आता चिन्मय, तन्मय, अर्थव स्वतः.
एका बाजुला अमेरिकेच्या “Diversity Policy” ह्या उदार धोरणाचा 100 वर्षापासुन पुरेपुर फायदा घेत असलेले चिन्मय, तन्मय, अर्थव चे कुंटुबीय मात्र भारतामध्ये ओबीसी-एससी-एसटी साठी भारतीय घटनेने दिलेल्या आरक्षणाचा जोरदार विरोध करतात. असा हा ह्यांचा दुटप्पीपणा आहे. अमेरिका-युरोपमध्ये तिथल्या श्वेत वर्णिय लोकांनी, ह्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणुन वागवु नये अशी अपेक्षा ठेवणारे हे चिन्मय, तन्मय, अर्थव चे कुंटुबीय, भारतात मात्र बहूजन समाजाच्या लोकांना स्वतःपेक्षा कनिष्ठ समझतात.
ह्यामध्ये मुख्य गंमत अशी कि चिन्मय, तन्मय, अर्थव च्या आजोबा-पणजोबा, काका-मामा, आत्या-मावशी ह्यापैकी कोणीही भारतात सुट्टीवर आल्यावर, त्यांच्या शेजारी राहणार्या दत्ता पाटील, बाळु शिंदे, बबन मोहिते, प्रकाश कांबळे, अजय पवार, नंदिनी भोसले, अर्चना जाधव, शालिनी बनकर ह्यांना कधीच परदेशातील शिक्षणाबद्यल, तिथे मिळणार्या संधीबद्यल सांगितल नाही. परदेशातील तर दूरच, पण भारतामध्ये शिक्षणाच्या, नौकरीच्या, उद्योगाच्या काय संधी आहेत ह्यावर सुद्धा चिन्मय, तन्मय, अर्थव च्या कुटुंबातील लोकानी किंवा त्यांनी स्वतः त्यांच्या काँलोनीतील बहूजन शेजार्यांना कधीच ह्यासंबधीत मार्गदर्शन केल नाही. ह्याऊलट त्यांना वेळोवेळी चुकीचा सल्ला देऊन त्यांना देव-धर्म, बाबा-बुवा, पुजा-पाठ, व्रत-वैकल्य, सण-ऊत्सव ह्यामध्ये वर्षभर बांधुन ठेवलय.
त्यामुळेच, आज पाटलाचा दत्त्या, बनकर दिल्या, भोसल्यांची नंदिनी व जाधवराव पाटलांची अर्चना, ढोल प्रॅक्टीस मधे मग्न आहे.शिंदे बाळ्या.. थराची.. रिहर्सल करतोय. मोहित्यांचा बबन्या गणपती मंडळात सजावट करतोय व बनकरांची शाली गणपतीच्या आरत्या पाठ करण्यात मग्न आहे.कांबळ्याचा पक्या , पवारांचा अज्या व डोंगऱ्याचा विक्या वर्गणी गोळा करायला तयार आहे. तर अर्थव, चिन्मय व तन्मय अमेरिकेत हार्रवर्ड, स्टॅनफोर्ड, एमआयटी, कोलंबिया, युसीबी, ई. नामांकित विद्यापीठांच्या लायब्ररीज मध्ये बसुन एमएस आणि पीएचडी चा अभ्यास करत आहेत.
चिन्मय, तन्मय , अथर्व स्टोरी Continues….
तिकडे अमेरिकेत चिन्मय फडके पी.एच. डी च्या अभ्यासात बिझी आहे. पुढच्या महिन्यात एका आंतरराष्ट्रिय काँन्फरंस मध्ये त्याला शोधनिबंध प्रेसेन्ट करायचा.
तन्मय कुळकर्णी नासा च्या एका नविन प्रोजेक्ट वर काम करतोय.
अथर्व गाडगीळ MS करत असतांना पीएचडी साठी कुठे अप्लाई करायचा ह्यावर काम करतोय.
इकडे, चिन्मयच्या घरी दिड दिवसाचा Eco Friendly गणपती बसवला होता. वर्षभर शोकेस मध्ये बंद असलेल्या पंचधातुच्या मुर्तिची रितसर प्रतिष्ठापना केली गेली. चिन्मय व्हाटस् अँप वरुन आरतीत सहभागी झाला व Online दर्शन घेतल. दिड दिवसानंतर घरीच विर्सजन झाले. घरी एक मोठा टब आहे, त्यामध्ये मुर्तिला बुडवुन बाहेर काढुन स्वच्छ पुसुन, शोकेस मध्ये मुर्ति परत ठेवण्यात आली. चिन्मयच्या बाबांना पुजापाठ येत असल्यामुळे, भटाला बोलवायची गरज नव्हती. अगदी 500 रू मध्ये सगळा कार्यक्रम पार पडला.
तन्मयच्या घरी त्याच्या आईने महालक्ष्मी गौरी मांडल्या होत्या. गणेश चतुर्थिनंतर तिसर्या दिवशी गौरी बसविल्या गेल्या आणि 2 दिवसानंतर गणपतीसोबत विर्सजन. दोन दिवसात सगळ आटोपलं.
अथर्व चे बाबा चिंतामणी गाडगीळ स्वतःच पुजारी असल्यामुळे ते सद्या खुप व्यस्त आहेत. सकाळी उठल्यापासुन रात्री 10 पर्यंत ते पुजा पाठात व्यस्त असतात. दिवसभरात 5-6 ठिकाणी तरी त्यांना पुजेसाठी बोलावणे असते. चिंतामणी गाडगीळ ह्यांनी मंडळांच्या सत्यनारायण आणि इतर पुजेसाठी आतापर्यंत मिळालेली 1 लाख रु दक्षिणा लगेच केली म्युच्युअल फंडात गुंतवणूक. गाडगीळांनी अथर्वला खुशीने कळवली ही खबर.
दुसरीकडे मोहित्यांचा बबन्यानी कामावरुन 15 दिवसांची सुट्टी घेतली. गणपती मंडळात सजावटीची सर्व जबाबदारी त्याची. त्यामुळे त्याला पुर्णवेळ राहिल्या शिवाय पर्याय नाही. बनकरांच्या शालीने, जी SY B Com ला आहे, गणपतीच्या आरत्या पाठ करायच्या असल्यामुळे, 2-3 आठवड्यापासुन काँलेजला दांडी मारलेली. सगळ्या आरत्या पाठ केल्यामुळे, शालीला प्रत्येक आरतीला उपस्थित रहाणे आवश्यक आहे. शालीला उत्कृष्ट महिला कार्यकर्ती पुरस्कार आणि निर्लेपचा मोठा तवा बक्षीस मिळाला.
कांबळ्याचा पक्या , पवारांचा अज्या व डोंगऱ्याचा विक्याने वर्गणी गोळा करायची महत्वाची जबाबदारी पार पाडली. 6 तारखेला विसर्जन होईपर्यंत त्यांना पण कुठे हलता येणे शक्य नाही.
ह्या तिघांना दहिहंडीत पण होतकरु कार्यकर्ते म्हणुन पारीतोषिक मिळाले आहेत , आता पक्याच्या घरचा मोडका शोकेस ट्रॉफी आणि पारीतोषिकाने सुंदर दिसु लागलाय ! ?