या टायरला बाहेर काढायला फक्त दोन उपाय आहेत. एकतर टायर कापा नाहीतर झाड दोघांपैकी एकाला कापावंच लागेल. नाहीतर नाईलाजास्तव सोबत तरी रहावं लागेल आणि यांचा एक दुसऱ्याला काही फायदा पण नाही. या टायरला झाड लहान असतानाच कुणीतरी याच्या गळ्यात अडकवलंय आणि आज ह्या टायर बाबतीत झाडाचा नाईलाज होऊन गेला आहे..! अशाच प्रकारे 15% मनुवाद्यांनी 85% बहुजनांच्या डोक्यात लहानपणापासूनच भाग्य, शांती, पंचांग, भविष्य, कर्मकाड, होम हवन, सत्यनारायण, दहावा, तेरावा, अनिष्ट रुढी-परंपरा, दशक्रिया विधी परंपरा, कावळ्याला जेवण दिल्यावर तो बापा पर्यत पोहचवेल, धर्म, जाती काही काल्पनिक देव, जातीयवाद, मंदिर, मस्जिद, चर्च इतर धार्मिकस्थळे इ. कर्मकाड अंधश्रद्धा श्रेष्ठ-कनिष्ठचे विष रूपी मनुवादी…मानसिक गुलामीचे टायर अडकवुन ठेवले आहे. त्यामुळे इच्छा असुनही मानसिक गुलामांना त्या टायर पासून विभक्त होणे शक्य होत नाही आणि त्यांना दुसरा काही मार्ग सापडत नाही आहे..! त्यामुळेच ते मानसिक गुलामीत, खोट्याच अभिमानात जगत आहेत…त्यामुळे आपला बहूजन समाजाचं वैचारिक परिवर्तन कधीच होणार नाही…!
खच्चून भरलेल्या लोकलच्या डब्यात दुसऱ्याच्या कडेवरच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन कोणीतरी खिडकीबाहेरची गंमत दाखवतं,
लेटमार्क लागू नये म्हणून धावणाऱ्या एखाद्याला दरवाजातले चार हात उचलून आत ओढून घेतात,
पुलावरच्या गर्दीत कुणीतरी टाकून दिलेला, हात पाय नसलेला भिकारी कुणाच्याही पायाखाली येत नाही, लोक त्याला पायही न लावता पुढे निघून जातात,
प्लॅटफॉर्मच्या कडेला उभं असलेल्या कुणालातरी कुणीतरी झपकन मागे ओढतं, क्षणात एखादी लोकल धडधडत निघून जाते,
तोपर्यंत ह्या देशात जन्मल्याचा मला पश्चाताप होणार नाही,
दुचाकीवरून जाणाऱ्या एखाद्याची फाटकी टिफिन बॅग तुटून पडले आणि मागून येणारी मर्सिडीज तिला शिताफीने चकवून पुढे जाते, एखादा दुचाकीवाला थांबून ती उचलतो, पाहिल्याला देतो, दोघेही हसून निघून जातात,
खोदलेल्या रस्त्यावर एखादी दुचाकी घसरते, चारजण त्याला बसते करतात, पाणी पाजतात, थांबून कोणीच राहत नाही पण लगेच निघूनही जात नाही, शक्यतो कुणाला फार लागत नाही,
चढावर एखादा आपली बंद पडलेली मोटारसायकल ढकलत असतो, मागून कुणीतरी येतो, पाय लावतो, त्याला गॅरेज गाठून देतो, गाडी सुरू होते,
तोपर्यंत हा देश बंद पडेल असं मला वाटत नाही.
इथे लोकं कायदे मोडतात, पण सगळेच बेपर्वा नसतात. बेशिस्त असतात पण सगळेच बेशरम नसतात. माणसं भांडतात पण शक्यतो बंदुका काढत नाहीत, चार जण रस्त्यावर भांडतात तेंव्हा दहा जण समजावत असतात,
नियम वाकवले जातात पण किती वाकवायचे ह्याची चौकट शक्यतो पाळली जाते. प्रचंड स्पर्धा असलेल्या ह्या देशात माना पिरगळल्या जातात पण शक्यतो गळे कापले जात नाहीत. लोकं जगतात, जगण्याचा हक्क नाकारला जात नाही.
आणि हे जगणं स्वीकारलेले लोक हळूहळू ह्या देशाला चांगलं, अजून चांगलं करत नेतील हा विश्वास आहे तोपर्यंत ह्या देशात जगण्याला शाप म्हणावं असं मला वाटत नाही.
भारत ही पृथ्वीवरची सगळ्यात छान जागा नसेलही, भारतीय ही जगातली सगळ्यात चांगली ओळख नसेलही, भारतीय सरकार हे जगातलं सगळ्यात चांगलं सरकार नसेलही,
पण मी कोण आहे?
मी माणूस म्हणून सगळ्यात छान आहे? माणूस म्हणून माझे वागणे आदर्श आहे? नागरिक म्हणून माझे वागणे निर्दोष आहे?
माझ्यापुरते ह्याचे उत्तर नाही असेच आहे आणि म्हणूनच मला मिळालेला देश, समाज आणि सरकार माझ्या लायकीनुसार मिळाले आहे असे मी समजतो.
ह्या सगळ्या गोष्टी सुधारण्याची पहिली पायरी म्हणजे स्वतःला सुधारणे, मागण्याच्या आधी देणे, बोलण्याच्या आधी करून दाखवणे, रडण्याचा आधी चार लोकांना जगवून दाखवणे.
जोपर्यंत हे तुम्हांला जमत नाही तोपर्यंत ना हा देश सुधारेल, ना इतर कुठला देश तुम्हांला बोलावेल..
कारण आपली किंमत आपल्याला माहीत नसली तरी जगाला माहीत असते, दोन्ही अर्थानी.. लेखक माहिती नाही, पण छान लिहलंय 🙏🙏
आपला जन्मच बलात्कारातून झालाय, विवाहाशिवाय आपली आई आणि दोन मावश्या बाप म्हणून आजपर्यत मिरवलेल्या नराधमाकडून इच्छा नसताना गरोदर राहिल्या. पुढे वेळ निघुन गेल्यावर मात्रुत्वाच्या संवेदनांत बलात्काराच्या वेदना त्या विसरल्या.
हे जेव्हा त्या नुकत्याच कुमारवयात प्रवेश करणाऱ्या मुलाला कळालं, तेव्हा हादरलेल्या त्या तरूणाची झालेली अवस्था भयानक होती. आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंतचा त्याचा प्रवास आणि नंतरचंं परिवर्तन सगळच जबराटपणे व नंतरचा तो रावण राजा बहूजणांना होता
चिन्मय फडके, तन्मय कुळकर्णी व अर्थव गाडगीळ हेच नाही तर त्यांचे आजोबा-पणजोबा सुद्धा शिक्षणासाठी, नौकरी-व्यवसायासाठी 100 वर्षा आधीपासुन सातसमुद्र ओलांडून युरोप-अमेरिकेत स्थलांतरीत झालेले आहेत.ज्या काळात त्यांच्या वैदिक धर्मानुसार समुद्र पार करून जाणे हे महापाप समजल्या जात होते, त्या काळात, धर्माच्या कर्मठ परंपरांना धाब्यावर बसवुन चिन्मय, तन्मय व अर्थव चे आजोबा-पणजोबा परदेशात गेले. आता त्यांचा जवळपास अर्धा परिवार युरोप, अमेरिका, कॅनडा, आॅस्ट्रेलिया, इ. ठिकाणी सेटल्ड आहे. त्यांचे काका,मामा, मावशी, आत्या असे बरेच नातेवाईक अमेरिका-युरोप मध्ये आहेत.
अमेरिकन विद्यापिठांमध्ये प्रवेशासाठी Diversity Policy (विविधता धोरण) राबविल्या जाते. म्हणजेच विद्यापिठांना वेगवेगळ्या देशांचे, वेगवेगळ्या संस्कृतीचे, वेगवेगळ्या भाषा बोलणारे, वेगवेगळ्या वंशाचे-वर्णाचे विद्यार्थी त्यांच्या विद्यापीठात पाहिजे असतात. विद्यापीठांच्या अभ्यासानुसार व अनुभवानुसार, वर्गात असे विविधता असलेले विद्यार्थी असले कि, शिक्षणाचा दर्जा उंचावतो. असे विविधता असलेले विद्यार्थी आपल्या विद्यापिठांत यावे म्हणुन सगळे नामांकित विद्यापीठ फार उदारपणे परदेशातल्या विद्यार्थ्यांना स्काँलरशिपस्, ग्रँन्टस् देतात, ज्याच्या मदतीने विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करु शकतात. अमेरिकेतील मोठमोठे उद्योगसमुह पण विद्यापीठांना मोठमोठ्या देणग्या देतात. अमेरिकन सरकार सुद्धा विद्यापीठांना भरभरुन अनुदान देते. ह्या अमेरिकेच्या उदार शैक्षणिक धोरणाचा पुरेपुर फायदा मागच्या 100 वर्षात, जर कोणी घेतला असेल तर तो चिन्मय, तन्मय व अर्थव च्या आजोबा-पणजोबांपासून तर आता चिन्मय, तन्मय, अर्थव स्वतः.
एका बाजुला अमेरिकेच्या “Diversity Policy” ह्या उदार धोरणाचा 100 वर्षापासुन पुरेपुर फायदा घेत असलेले चिन्मय, तन्मय, अर्थव चे कुंटुबीय मात्र भारतामध्ये ओबीसी-एससी-एसटी साठी भारतीय घटनेने दिलेल्या आरक्षणाचा जोरदार विरोध करतात. असा हा ह्यांचा दुटप्पीपणा आहे. अमेरिका-युरोपमध्ये तिथल्या श्वेत वर्णिय लोकांनी, ह्यांना दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणुन वागवु नये अशी अपेक्षा ठेवणारे हे चिन्मय, तन्मय, अर्थव चे कुंटुबीय, भारतात मात्र बहूजन समाजाच्या लोकांना स्वतःपेक्षा कनिष्ठ समझतात.
ह्यामध्ये मुख्य गंमत अशी कि चिन्मय, तन्मय, अर्थव च्या आजोबा-पणजोबा, काका-मामा, आत्या-मावशी ह्यापैकी कोणीही भारतात सुट्टीवर आल्यावर, त्यांच्या शेजारी राहणार्या दत्ता पाटील, बाळु शिंदे, बबन मोहिते, प्रकाश कांबळे, अजय पवार, नंदिनी भोसले, अर्चना जाधव, शालिनी बनकर ह्यांना कधीच परदेशातील शिक्षणाबद्यल, तिथे मिळणार्या संधीबद्यल सांगितल नाही. परदेशातील तर दूरच, पण भारतामध्ये शिक्षणाच्या, नौकरीच्या, उद्योगाच्या काय संधी आहेत ह्यावर सुद्धा चिन्मय, तन्मय, अर्थव च्या कुटुंबातील लोकानी किंवा त्यांनी स्वतः त्यांच्या काँलोनीतील बहूजन शेजार्यांना कधीच ह्यासंबधीत मार्गदर्शन केल नाही. ह्याऊलट त्यांना वेळोवेळी चुकीचा सल्ला देऊन त्यांना देव-धर्म, बाबा-बुवा, पुजा-पाठ, व्रत-वैकल्य, सण-ऊत्सव ह्यामध्ये वर्षभर बांधुन ठेवलय.
त्यामुळेच, आज पाटलाचा दत्त्या, बनकर दिल्या, भोसल्यांची नंदिनी व जाधवराव पाटलांची अर्चना, ढोल प्रॅक्टीस मधे मग्न आहे.शिंदे बाळ्या.. थराची.. रिहर्सल करतोय. मोहित्यांचा बबन्या गणपती मंडळात सजावट करतोय व बनकरांची शाली गणपतीच्या आरत्या पाठ करण्यात मग्न आहे.कांबळ्याचा पक्या , पवारांचा अज्या व डोंगऱ्याचा विक्या वर्गणी गोळा करायला तयार आहे. तर अर्थव, चिन्मय व तन्मय अमेरिकेत हार्रवर्ड, स्टॅनफोर्ड, एमआयटी, कोलंबिया, युसीबी, ई. नामांकित विद्यापीठांच्या लायब्ररीज मध्ये बसुन एमएस आणि पीएचडी चा अभ्यास करत आहेत.
चिन्मय, तन्मय , अथर्व स्टोरी Continues….
तिकडे अमेरिकेत चिन्मय फडके पी.एच. डी च्या अभ्यासात बिझी आहे. पुढच्या महिन्यात एका आंतरराष्ट्रिय काँन्फरंस मध्ये त्याला शोधनिबंध प्रेसेन्ट करायचा.
तन्मय कुळकर्णी नासा च्या एका नविन प्रोजेक्ट वर काम करतोय.
अथर्व गाडगीळ MS करत असतांना पीएचडी साठी कुठे अप्लाई करायचा ह्यावर काम करतोय.
इकडे, चिन्मयच्या घरी दिड दिवसाचा Eco Friendly गणपती बसवला होता. वर्षभर शोकेस मध्ये बंद असलेल्या पंचधातुच्या मुर्तिची रितसर प्रतिष्ठापना केली गेली. चिन्मय व्हाटस् अँप वरुन आरतीत सहभागी झाला व Online दर्शन घेतल. दिड दिवसानंतर घरीच विर्सजन झाले. घरी एक मोठा टब आहे, त्यामध्ये मुर्तिला बुडवुन बाहेर काढुन स्वच्छ पुसुन, शोकेस मध्ये मुर्ति परत ठेवण्यात आली. चिन्मयच्या बाबांना पुजापाठ येत असल्यामुळे, भटाला बोलवायची गरज नव्हती. अगदी 500 रू मध्ये सगळा कार्यक्रम पार पडला.
तन्मयच्या घरी त्याच्या आईने महालक्ष्मी गौरी मांडल्या होत्या. गणेश चतुर्थिनंतर तिसर्या दिवशी गौरी बसविल्या गेल्या आणि 2 दिवसानंतर गणपतीसोबत विर्सजन. दोन दिवसात सगळ आटोपलं.
अथर्व चे बाबा चिंतामणी गाडगीळ स्वतःच पुजारी असल्यामुळे ते सद्या खुप व्यस्त आहेत. सकाळी उठल्यापासुन रात्री 10 पर्यंत ते पुजा पाठात व्यस्त असतात. दिवसभरात 5-6 ठिकाणी तरी त्यांना पुजेसाठी बोलावणे असते. चिंतामणी गाडगीळ ह्यांनी मंडळांच्या सत्यनारायण आणि इतर पुजेसाठी आतापर्यंत मिळालेली 1 लाख रु दक्षिणा लगेच केली म्युच्युअल फंडात गुंतवणूक. गाडगीळांनी अथर्वला खुशीने कळवली ही खबर.
दुसरीकडे मोहित्यांचा बबन्यानी कामावरुन 15 दिवसांची सुट्टी घेतली. गणपती मंडळात सजावटीची सर्व जबाबदारी त्याची. त्यामुळे त्याला पुर्णवेळ राहिल्या शिवाय पर्याय नाही. बनकरांच्या शालीने, जी SY B Com ला आहे, गणपतीच्या आरत्या पाठ करायच्या असल्यामुळे, 2-3 आठवड्यापासुन काँलेजला दांडी मारलेली. सगळ्या आरत्या पाठ केल्यामुळे, शालीला प्रत्येक आरतीला उपस्थित रहाणे आवश्यक आहे. शालीला उत्कृष्ट महिला कार्यकर्ती पुरस्कार आणि निर्लेपचा मोठा तवा बक्षीस मिळाला.
कांबळ्याचा पक्या , पवारांचा अज्या व डोंगऱ्याचा विक्याने वर्गणी गोळा करायची महत्वाची जबाबदारी पार पाडली. 6 तारखेला विसर्जन होईपर्यंत त्यांना पण कुठे हलता येणे शक्य नाही. ह्या तिघांना दहिहंडीत पण होतकरु कार्यकर्ते म्हणुन पारीतोषिक मिळाले आहेत , आता पक्याच्या घरचा मोडका शोकेस ट्रॉफी आणि पारीतोषिकाने सुंदर दिसु लागलाय ! ?
रामराज्य हे फक्त नाव गोंडस आहे. पौराणिक काळात रामराज्यात शूर्पनखेचे नाक कापले गेले, सीतेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली गेली आणि ब्राम्हणाच्या खोट्या आरोपावरून शंबुक नामक शूद्राचा खून झाला. थोडक्यात स्त्री आणि शूद्र यांना कसलीही किंमत नव्हती.
मध्ययुगीन रामराज्याच्या कल्पनेत रामचरीतमानसमध्ये (जे आमच्या लहानपणी लता मंगेशकर रेडिओवर भावपूर्ण आवाजात गाऊन दाखवायच्या) स्त्रिया, दलित, अडाणी, आणि पशु हे फक्त बडवण्याच्या लायकीचे आहेत असं लिहून ठेवलंय. आजही हे रामचरीतमानस गायपट्टयात जीवनाचा आदर्श मानले जाते.
असल्या रामराज्यात राहायचं आहे तुम्हाला? की आधुनिक लोकशाहीत, संविधानावर आधारित कायद्याच्या राज्यात राहायचं आहे? स्वतःच्या बायको, पोरीकडे जाऊन चौकशी करा आणि स्वतःच्या मनाला एकदा विचारून बघा…. कायद्याचं राज्य हवं असेल तर जात-धर्म-लिंग आदी बाबतीत द्वेष करणाऱ्या कुठल्याही व्यक्ती, विचार आणि पक्ष-संघटनेसोबत उभारू नका!
विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी, शाळा, महाविद्यालय सुरू केले का?. कोणाला अध्यापन केल्याची नोंद आहे का?. तसा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकार नव्हता.
सरस्वती एक महिला म्हणून तिच्याबद्दल नितांत आदर आहे, परंतु सार्वजनिक आणि मोफत शिक्षणाचा पाया आपल्या देशात प्रथमतः फुले दांपत्याने घातला. सावित्रीबाई फुले या भारतातील आद्य स्त्री शिक्षिका आहेत. त्यांनी सर्व जातीधर्मातील मुलामुलींना मोफत शिक्षण दिले. त्यांनी ब्राह्मण मुलींना देखील आनंदाने शिकवले. सावित्रीबाई फुले यांच्या काळात जर सरस्वती जन्माला आली असती तर सावित्रीबाईंनी सरस्वतीलासुद्धा शिकविले असते, इतक्या मोठ्या मनाच्या सावित्रीबाई होत्या.
सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे नेवसे पाटलांच्या कुटुंबात झाला. बालपणापासूनच त्या जिज्ञासू होत्या. 1840 साली त्यांचा विवाह जोतीराव फुले यांच्याबरोबर झाला. जोतीराव फुले यांनी तत्कालीन अनिष्ट प्रथा नाकारून सावित्रीबाई फुले यांना शिक्षण दिले. फुलेंनी परिवर्तनाची सुरुवात स्वतःच्या कुटूंबापासून केली. या कार्याला जोतीरावांच्या वडिलांचा विरोध होता. जोतीराव फुले यांनी घर सोडले पण शिक्षण देण्याचे कार्य सोडले नाही.
फुलेंनी पहिली शाळा 1 जानेवारी 1848 रोजी सुरू केली. ही देशातील पहिली सार्वजनिक आणि मोफत शाळा आहे. त्या शाळेच्या पहिल्या स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून फातिमा शेख यांनी अध्यापनाचे काम केले.
ज्ञानाचे महत्त्व सांगताना सावित्रीबाई फुले लिहितात "ज्ञान नाही, विद्या नाही। ती घेणेची गोडी नाही। बुद्धी असून चालत नाही। तयास मानव म्हणावे का?।" मानव हा बुद्धी ग्रहण करण्यास लायक आहे, त्यामुळे त्याने ज्ञानार्जन केले पाहिजे, मानव जर ज्ञानार्जन करत नसेल तर त्याला मानव तरी का म्हणायचे? असा प्रश्न सावित्रीबाई फुले विचारतात. सावित्रीबाई फुले यांनी मराठी भाषेचा कैवार घेतला. मराठीचा अभिमान बाळगला, परंतु इंग्रजी भाषेचा त्यांनी कधीही तिरस्कार केला नाही, याउलट इंग्रजी भाषेचे महत्व सांगणारी कविता त्यांनी लिहिली. त्या लिहितात "इंग्रजी माऊली । इंग्रजी वैखरी । शूद्रांना उद्धारी । मनोभावे ।"
इंग्रजी भाषेत शिक्षण घेतले तर तुमच्या पिढ्यानपिढ्याचे कल्याण होईल, असे सावित्रीबाई फुले यांचे मतहोते.ते मत आज खरं ठरले आहेत.इंग्रजी भाषा शिकल्यामुळे अनेक लोक डॉक्टर, बॅरिस्टर, इंजिनिअर, वकील झालेले आहेत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सावित्रीबाईना शिकविले. त्या देशातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या अन्यायअत्याचाराच्या विरुद्ध लढल्या. त्यांनी सर्व जाती धर्मातील मुला-मुलींना मोफत शिकविले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाहाला चालना दिली. बालविवाहाला प्रतिबंध केला. सावित्रीबाई फुले यांनी केशवपन पद्धतीला विरोध केला. या अमानुष प्रथेविरुद्ध त्या लढल्या. सत्यशोधकांनी विधवा बालिकांचा आक्रोश कवितेतून पुढीलप्रमाणे व्यक्त केला आहे. *"काहो आण्णा, मी तुमची लाडकी । का करिता मला बोडकी ।।"* सावित्रीबाई फुले या अत्यंत संवेदनशील, कारुण्यमय मनाच्या होत्या. त्यामुळे त्या अन्यायाविरुद्ध लढल्या सावित्रीबाई फुले या प्रागतिक विचारांच्या होत्या. त्यांनी अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, नवस सायास इत्यादी अंधश्रद्धेवर कडाडून हल्ला केला. त्या म्हणतात. "धोंडे मुले देती,नवसा पावती लग्न का करती नारी नर?" नवसाने मुलं होत असतील तर मग लग्नाचीच गरज काय? असा सवाल सावित्रीबाई विचारतात. सनातनी व्यवस्थेला प्रश्न विचारायची हिम्मत त्यांच्याकडे होती. ही हिम्मत त्यांच्याकडे आधुनिक शिक्षणाने आलेली होती. सावित्रीबाई फुले यांनी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना करून निराधार महिलांना आधार दिला. दुष्काळग्रस्तांना मदत केली. गुंडांना पायबंद घातला. समाजातील. कर्मठ, सनातनी लोकांना त्या घाबरल्या नाहीत. धर्मांध लोकांना त्यांनी निर्भीडपणे प्रतिकार केला. सावित्रीबाई फुले आपल्या पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. माहेरी गेल्यानंतर जोतिरावांना पाठवलेल्या पत्रात त्या म्हणतात "कांही वैरी विदूषक आपल्याला ठार मारण्यास टपलेले आहेत,पण त्यांच्या भीतीने आपण हे शैक्षणिक, समाज परिवर्तनाचे काम अर्ध्यावर सोडायचे नाही". सावित्रीबाई फुले यांच्या या भूमिकेतून त्यांचा निर्भीडपणा, हिम्मत आणि लढाऊ बाणा प्रकर्षाने दिसतो. त्यांनी महात्मा फुले यांना संकटसमयी प्रोत्साहन दिले, त्यांना नाउमेद केले नाही. स्त्री असल्याचा त्यांनी कधीही न्यूनगंड बाळगला नाही. सावित्रीबाई माहेरी असताना त्यांनी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन दिले. अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थाना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. माहेरी जाऊन त्या सुखात राहिल्या नाहीत, तर तेथे देखील त्यांनी प्रबोधन कार्य चालूच ठेवले. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर त्यांनी सत्यशोधक चळवळीचे नेतृत्व केले.पती निधनानंतर सती न जाता त्यांनी निर्भीडपणे सत्यशोधक चळवळीचे काम पुढे नेले. दत्तक पुत्र यशवंताला उच्च शिक्षण देऊन डॉक्टर केले. सकाळी उठल्याबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मरण करावे. त्यांचे दर्शन घेऊनच आपल्या दिवसाला सुरुवात करावी, असे सावित्रीबाई फुले एका काव्यातून सांगतात "छत्रपती शिवाजीचे । प्रातःस्मरण करावे। शूद्रादि अतिशूद्रांचा । प्रभू वंदू मनोभावे।"
महाराणी ताराराणी यांच्या कार्यकर्तृत्वाचा सावित्रीबाई फुले यांना मोठा अभिमान वाटत असे ताराराणीच्या कार्याची आणि शौर्याचे यथार्थ प्रदीर्घ वर्णन सावित्रीबाई फुले यांनी एका काव्यातून केले आहे. ” ताराबाई माझी मर्दिनी। भासे चंडिका रणांगणी। रणदेवी ती श्रद्धास्थानी। नमन माझिये तिचिया चरणी।” सावित्रीबाई फुले यांच्या जीवनात अनेक संकटे आली, पण त्या संकटात डगमगल्या नाहीत, निराश झाल्या नाहीत. संकटाला संधी समजून त्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात केली. सावित्रीबाई फुले लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. सावित्रीबाई फुले यांचे जीवन व कार्य आपल्याला हे सांगते की मुलगीसुद्धा वंशाला दिवा असते सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा एक अस्सल फोटो उपलब्ध आहे. .यामध्ये सावित्रीबाई जोतीरावांच्या उजव्या बाजूला उभ्या आहेत. म्हणजे स्त्री ही दुय्यम दर्जाची नसून ती देखील हिम्मतवान,बुद्धिमान आणि कर्तृत्ववान असते, हे जोतीराव फुलेंच्या नेणिवेतदेखील होते. सावित्रीबाई यांनी ते स्वकर्तृत्वाने दाखवून दिले, त्या भारतातील पहिल्या शिक्षिका आहेत. त्या केवळ पारंपारिक शिक्षिका नव्हत्या, तर त्या गुलामगिरी, अनिष्ट प्रथा, सनातनी गुंड, विषमता यांच्याविरोधात लढणाऱ्या लेखिका, कवयित्री आणि प्रबोधनकार होत्या. त्यांचा आज स्मृतिदिन, त्यानिमित्त त्यांना विनम्र अभिवादन!
१४ फेब्रुवारी, हा दिवस दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी खास असतो. ते या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि एकमेकांसोबत रोमॅन्टीक वेळ घालवतात. प्रत्येक प्रेम करणाऱ्यां युवकांची ही कहाणी त्यांच्यासाठी खास असते. हेच ते क्षण असतात, जे प्रेमी युगुल नेहमीच आपल्या आठवणीत साठवून ठेवतात आणि या आठवणी संपूर्ण आयुष्यभर घालवतात. या प्रसंगी एक अशी प्रेमकहाणी आहे. जी क्वचित काही लोकांना माहित असेल. एखादी दंतकथा वाटावी अशीच केकी मूस यांची ही प्रेमकथा.
50 वर्षांत फक्त दोनदाच घराबाहेर पडले केकीमुस
केकी मुस 50 वर्षात फक्त दोनच वेळा घराबाहेर पडले. याबाबत बीबीसी मराठीशी चर्चा करताना कमलाकर सामंत यांनी म्हटलंय, “केकींनी 50 वर्षांचा बंदिवास स्वतः स्वीकारला होता.
1939 पासून ते 1989 या 50 वर्षांच्या काळात ते फक्त दोनदाच घराबाहेर पडले होते.
एकदा 1957 ला त्यांच्या आईच्या अंत्यविधीसाठी ते औरंगाबादला गेले होते. तर दुसऱ्यांदा भूदान चळवळीदरम्यान विनोबा भावेंचं व्यक्तीचित्र घेण्यासाठी 1970 दरम्यान ते चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या वेटींग रूममध्ये गेले होते. खरंतर विनोबा भावेंचें भाऊ शिवाजी नरहर भावे हे केकींचे खास मित्र होते. त्यामुळे शिवाजीरावांच्या आग्रहाखातर ते घराबाहेर पडले होते.”
“भारताचे तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केकींना चाळीसगावच्या रेल्वे स्थानकावर भेटायला बोलवलं होतं. तेव्हा त्यांच्या आमंत्रणासही त्यांनी नम्रपणे नकार दिला होता. शिवाय त्यांनाच निरोप पाठवला होता की तुम्हाला जर माझ्या हातून व्यक्ती चित्र तयार करून हवं असेल तर तुम्हाला माझ्या घरी यावं लागेल. माझ्या घरात तुमचं स्वागत आहे. तेव्हा स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू केकींना भेटायला त्यांच्या घरी आले होते.” असंही सामंत पुढे म्हणाले.
केकी मुस जरी घराबाहेर पडत नसले तरी अनेक दिग्गज मंडळी केकींना भेटायला, त्यांच्याशी गप्पा मारायला त्यांच्या घरी येत असत. यामध्ये जवाहरलाल नेहरू, बाबा आमटे, आचार्य अत्रे, ना. सी. फडके, जयप्रकाश नारायण, साने गुरुजी, महर्षी धोडो केशव कर्वे, वसंत देसाई, पंडित महादेवशास्त्री जोशी, श्री. म. माटे, बालगंधर्व अशा अनेक लोकांचा समावेश आहे. यातील बहुतेक व्यक्तींचे केकींनी काढलेले छायाचित्र त्यांच्या संग्रहालयात आहे
ही प्रेमकहाणी आहे जागतिक कीर्तीचे छायाचित्रकार केकी मूस यांची. प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास ठेवून जवळपास ५० वर्ष आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत तिच्या येण्याची वाट पाहणारा हा प्रियकर दररोज पंजाब मेल ही रेल्वे गाडी येऊन गेल्याशिवाय जेवत नसत. ऐवढेच काय तर ती ट्रेन स्टेशनवर येऊन गेल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून नेहमी अश्रू येत असत.
खान्देशातील कलामहर्षी केकी मूस या महान कलाकारानं प्रेमात प्रियसीच्या आठवणीत चाळीसगावमध्ये ‘मूस आर्ट गॅलरी’ निर्माण केली. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या प्रियेशीची वाट पाहिली. प्रेमात या कलाकाराने निर्माण केलेली कलासृष्टी म्हणजेच चाळीसगावची ‘मूस आर्ट गॅलरी’!
कलामहर्षी केकी मूस कलादालनाचे विश्वस्त व कार्यकारणी सचिव कमलाकर सामंत हे त्यांच्या शालेय जीवनात केकी मूस यांना पहिल्यांदा चाळीसगावमध्येच भेटले होते. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई येथील विल्सन कॉलेजमधून केकी मुस यांनी कलेची पदवी घेतली. यादर्मान्य त्यांचं निलोफर नावाच्या मुलीवर प्रेम जडलं. सुरुवातीला निलोफर आणि केकी मुस यांच्यात फक्त मैत्री होती, परंतु ही मैत्री प्रेमात कधी बदलली हे दोघांनाही कळलं नाही. केकीं मुस यांनी जेव्हा मुंबई सोडून चाळीसगावला स्थायिक होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांची प्रेयसीही त्यांच्यासोबत येणार होती. ते दोघं लग्न करणार होते, मात्र या लग्नाला निलोफरच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे नीलोफरच्या घरच्यांनी केकी मुसला नापसंती दर्शविली व केकीं मुस सोबत निलोफर ला न पाठवण्याचा निर्णय घेतला.
१९३८ मध्ये केकी मुस यांनी चाळीसगावातील आपले वडिलोपार्जित घरी जाण्याचे ठरवीले केकी मुस ज्या दिवशी एकटेच मुंबई सोडून चाळीसगावला जाण्यासाठी निघाले त्या दिवशी त्यांची प्रेयसी निलोफर यांना तसे समजले निलोफर केकी मुस ला मुंबईच्या व्हिक्टोरिया स्टेशनवर म्हणजे आताच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल वर निरोप द्यायला आली होती. तेव्हा निलोफरनं केकी मूस यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिलं की, एक ना एक दिवस ती नक्की याच गाडीने (पंजाब मेलनं ) चाळीसगावला येईन आणि आपण दोघे आयुष्यभर सोबत राहू व सोबतच दररोजचे जेवण करीत जाऊ. आता सध्याला आई वडीलांचा आपल्या लग्नाला विशेध आहे त्यांची समजूत काढून मी नक्कीच येईन.
त्यामुळे प्रेयसीनं दिलेल्या वचनावर विश्वास असलेले केकी मूस दिवसभर बंद असलेली बंगल्याची सगळी दारं-खिडक्या रेल्वेगाडी येण्याच्या वेळेला उघडत असत. दिवे लावत असत.
लंडनहून येणारी फ्लाईट मुंबईला संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी यायची, वन डाऊन म्हणजे पंजाब मेल मुंबईहून बरोबर आंधार पडल्या नंतर सुटायची आणि मध्यरात्री चाळीसगावला यायची. रात्रीचा एक वाजायला आला की, केकी अस्वस्थ होत असत, ते बंगल्याची दारे खिडक्या उघडत आणि संध्याकाळीच आपल्याच बागेतील दुर्मिळ स्वच्छ ताजी फूले खुडून ठेवलेल्या गुलछडीच्या फुलांचा एक गुच्छ व्हरांड्यात आणून ठेवत असत. आणि प्रियेसिची वाट पाहत बसत व डोळ्यांतून येणाऱ्या अश्रूंना वाट मोकळी करून देत असत प्रियेसीची वाट पाहून झाल्यावरच ते रात्रीचे जेवण करीत असत.
नंतर नंतर जेव्हा त्यांच्या बागेतील फुलं कमी झाली तेव्हा त्यांनी शोभेच्या कागदी फुलांचा एक गुच्छ कायमचाच तयार करून ठेवला होता.
तसेच रोज रात्री दोन व्यक्तींच्या जेवनाची म्हणजेच प्रियेसी निलोफर च्या जेवणाची तयारीसुद्धा ते करून ठेवत असत. अशाप्रकारे त्यांच्या प्रेयसी निलोफरच्या स्वागताची ते रोज न चुकता तयारी करून ठेवत असत. केकी मुस पन्नास वर्ष निलोफर ची वाट पाहत या खिडकीतून सतत रंग न्याहाळत राहीले अगदी डोळे म्हातारे होईपर्यंत निलोफर ची वाट पाहत राहीले.
“त्यांनी प्रेयसीला दिलेला शब्द शेवटपर्यंत पाळला. दररोज पंजाबमेल रेल्वे गाडी गेल्यानंतरच ते जेवायचे. ३१ डिसेंबर १९८९ या त्यांच्या आयुष्यातल्या शेवटच्या रात्रीचं जेवण देखील त्यांनी पंजाब मेल गेल्यावरच घेतलं होतं.”
निलोफर आणि केकी मुस यांचं प्रेम खरं होतं, ज्यामुळे केकी मूसचा निलोफरच्या वचनावर खूप विश्वास होता, त्याच आशेवरती त्यांनी आपल्या आयुष्याचा अखेरचा श्वास घेतला. परंतु निलोफर कधी आलीच नाही.
निलोफर पुढे लंडनला निघून गेली आणि अखेरपर्यंत ती आलीच नाही. पण केकी मुस तिची आयुष्यभर वाट पाहत राहिले. १९४५ च्या वर्षा पर्यंत निलोफरची १०-१२ पत्रं आली असे म्हणतात पण केकींनी त्यातलं एकही पत्र उघडून वाचले नाही कारण त्यांची अशी रोमँटिक कल्पना होती की, ‘ती ( प्रियशी निलोफर) आल्यावरच तिच्या आवाजातच ती, तिने लिहिलेले पत्र वाचेल.’
सामंत यांनी दिलेल्या माहितीनुसार, केकी मुस गेल्यानंतर त्यांना दोन पत्रं सापडली. त्यातलं एक पत्र त्यांच्या प्रेयसीचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर दुसरं केकींच्या एक नातलग हाथीखानवाला यांचं असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
हाथीखानवाला यांनी त्या पत्रात केकींसांठी लिहिलं होतं की त्यांच्या प्रेयसीला लंडनला पाठवण्यात आलं आहे आणि तिकडं तिचं लग्नही करण्यात आलं आहे. मात्र, ते पत्र केकीं मुसनी कधीच वाचलं नसल्याचा खुलासा सामंत यांनी केला आहे.
केकी मुस चाळीसगावला पोहोचले कसे?
केकींचं पूर्ण नाव कैखुसरो माणेकजी मूस. मात्र त्यांची आई त्यांना ‘केकी’ म्हणायची. नंतर हेच नाव त्यांची ओळख बनलं. त्यांना बाबूजीदेखील म्हटलं जायचं. चाळीसगाव स्थानकाजवळ एक दगडी बंगल्यात ते राहायचे.
मुंबईतल्या मलबार हिलसारख्या उच्चभ्रू लोकवस्तीत ०२ ऑक्टोबर १९१२ मध्ये एका पारशी कुटुंबात पिरोजा आणि माणेकजी फ्रामजी मूस या आईवडीलांच्या पोटी केकींचा जन्म झाला.
आर. सी. नरिमन हे त्यांचे मामा मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक होते. तत्कालीन व्ही.टी स्टेशन अर्थात आजचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ही त्यांनीच बांधलेली वास्तू आहे.
तर मुंबईच्या विल्सन महाविद्यालयातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण करून केकी उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. खरंतर वयाच्या नवव्या वर्षांपासून चित्र काढणाऱ्या केकींना कलाकार व्हायचं होते.
परंतु माणेकजींना वाटे की केकींनी त्यांची सोडा वॉटर फॅक्टरी व दारूचं दुकान सांभाळावं. दरम्यान 1934-35 च्या सुमारास केकी मूस यांचे वडील माणेकजींचं निधन झाल्यावर आई पिरोजाजींनी दुकानाची जबाबदारी स्वीकारली. पदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईच्या विल्सन कॉलेजमध्ये झाले होते आणि त्यानंतर कमर्शियल आणि फाईन आर्टस् मधला डिप्लोमा घेण्यासाठी ते इंग्लंडला जाण्याचे ठरविले. केकींनी 1935 मध्ये लंडनमधील ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’मध्ये प्रवेश घेतला. केकींनी चार वर्षांत त्यांचा कमर्शियल आर्टचा डिप्लोमा पूर्ण केला. 1938 मध्ये हा डिप्लोमा घेतल्यानंतर त्यावेळच्या धनिक लोकांमध्ये प्रथा होती त्याप्रमाणे शिक्षण पूर्ण करून जगप्रवासाला गेले होते.
याच अभ्यासक्रमात फोटोग्राफी हा विषय देखील होता. 1937 साली केकींनी त्याचाही अभ्यास केला. नंतर ‘रॉयल सोसायटी ऑफ आर्ट ऑफ ग्रेट ब्रिटन’ या संस्थेनं त्यांना मानद सभासदत्व दिलं.
त्यानंतर केकी अमेरिका, जपान, रशिया, स्वित्झर्लंडला गेले. तिथं फोटोग्राफीची अनेक प्रदर्शनं पाहिली. अनेक कलाकारांना भेटले आणि 1938 साली भारतात परत आले.
त्यानंतर ते मुंबईवरून चाळीसगावमध्ये आले आणि त्यानंतर जवळपास पन्नास वर्षें त्यांनी त्यांच्या बंगल्यात स्वत:ला आत्मकैद करुन घेतलं.
रेम्ब्राँ हा डच चित्रकार केकींचं प्रेरणास्थान होता. रेम्ब्राँ या चित्रकाराचा त्यांच्या मनावर खूप प्रभाव होता. त्यामुळे त्यांनी त्यांच्या बंगल्याचे ‘आशीर्वाद’ हे नाव बदलून ‘रेम्ब्राँज रिट्रीट’ असं ठेवलं.
आयुष्यभर प्रेयसीची वाट बघत कलेमधे स्वतःला वाहून घेतलेल्या या महान कलाकारानं ३१ डिसेंबर १९८९ ला सकाळी ११ : ०० च्या सुमारास त्याच घरातून जगाचा निरोप घेतला.
दरम्यान महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ यांनी 1983 ला केकी आणि त्यांच्या छायाचित्रणावरील ‘केकी मूस – लाइफ अँड स्टिल लाईफ’ हे पुस्तक प्रकाशित केलं आहे.
‘व्हेन आय शेड माय टीअर्स’ हे केकींनी स्वतः लिहिलेलं स्वतःचं आत्मचरित्र अजून प्रकाशित झालं नसल्याची माहिती कमलाकर सामंत यांनी बीबीसी मराठीला दिली.
-कमलाकर सामंत
प्रसिद्ध छायाचित्रकार “केकी मूस” यांनी चाळीसगाव रेल्वे स्थानकाच्या जवळच्या रेम्ब्रा रिट्रीट येथे पन्नास वर्षे स्वतःला कोंडून घेऊन प्रेयसीची वाट बघण्यात घालवले
शालेय जिवणातील आठवणीत राहणारे वर्षे म्हणजे १०वी चे वर्षे असते. १० वी नंतर पुढिल शिक्षणासाठी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या दिशा आसतात प्रत्येकाची परिस्थिती वेगवेळी असते प्रत्येकजण परिस्थितीचा सानाना करीत इतरत्र शिक्षणासाठी स्थलांतरीत होतात. त्यामुळे कॉलेज बदलली जातात काही विद्यार्थी वेगवेगळ्या शहरातील नामांकित कॉलेजला ॲडमिशन घेतात आर्टस कॉमर्स सायन्स हे आपआपल्या आवडीने निवडीचे विभाग आसतात अशा एक ना अनेक कारणाने सर्व वर्गमित्र विभागले जातात. मित्र बदलले जातात. शिक्षक बदलले जातात त्यामुळे परत सगळं नवीन नवीन असल्यासारखे वाटत असतं. त्यातच आपण आश्रम शाळेवरचे विद्यार्थी अनेक खेडोपाडयांतून वेगवेगळ्या जिल्हयांच्या ठिकांणांहून शिक्षणासाठी आलेलो होतो १०वी नंतर सर्व वर्गमित्रांची वेगवेगळ्या स्थरांवर विभागणी होत जाते. १०वी च्या मित्रांचे कित्येक वर्ष उलटून गेलेली आसतात तरी गाठभेट होता होत नाही
१०वी चा वर्ग शाळा सोडून जमतेम २५ वर्षे झाली होती वर्गातील जनतेम सर्वच वर्गमित्रांना २५ वर्षानंतर प्रत्येकासी भेटणे शक्य होत नव्हते अधुन मधुन कधीतरी एखाद्या मित्राबरोबर फोनवर बोलणे होत असे पण प्रत्येकाशी २५ वर्षे झाले आसतील भेटलेलो नाही. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा एक वॉटसॲप ग्रूप आहे त्या ग्रुपवर आम्हा मित्रांचे अधून मधून वेगवेगळ्या विषयांवर चर्चा होत असतात एकमेकांच्या विचारांचे देवाण घेवाण होत असते.
आमच्या पैकीच एका मित्राने मित्र स्नेह मेळावा आयोजित केला जावा अशी इच्छा व्यक्त केली होती आणि बघता बघता सर्वच मित्रांनी स्नेह मित्र मेळावा आयोजित करण्यात यावा या विषयी प्रोत्साहन वाढत गेले. आमच्या शाळेतील इयत्ता १० वी वर्गमित्रांचा (१९९८ – ९९ ) स्कूल फ्रेंड्स नावाचा एक वॉट्सॲप ग्रूप आहे त्यावर मेशेज वाइरल होऊ लागले कि मित्र स्नेह मेळावा आयोजित करण्यात यावा व सर्व वर्गमित्र मैत्रिणीं व शिक्षकांना एकत्रीत आमंत्रीत करूण पुन्हा एकदा त्याच वर्गात त्याच बँचवर बसून जुन्या आठवणींना उजाळा दिला जावा असे वाटत आसतानाच सर्वांनुमताने १२ डिसेंबर २०२४ ही तारीख स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी सुनिश्चित करण्यात आली. ठरल्या प्रमाणे वर्ग मित्रांचा स्नेह मेळावा आयोजित होणार आहे हे समजल्यावर मी अतिशय आनंदीत झालो आपणच आपल्यासाठी स्नेह मेळाव्याचा कार्यक्रमात आयोजित करणार होतो त्या कार्यक्रमात सहभागी होता यावे म्हणून मी सुट्टी घेऊन एक महिन्याच्या रजेवर गावाकडे गेलो होतो. मित्र स्नेह मेळावा म्हणजे सर्व मित्रांना इतक्या वर्षांनी एकमेकांना भेटण्याची संधी उपलब्ध करून घेण्यात आलेला दिवस त्यात प्रत्येक मित्र वेळ न दडवता हजेरी लावतो आपआपल्या आयुष्याच्या व्यस्त वेळापत्रकातून शाळेसाठी गुरुजनांसाठी मित्रांसाठी वेळ काढून एकत्रीत येणार असतात एकमेकांचा विचार करण्यासाठी आणि आपली चिंता आनंद व्यक्त करण्यासाठी जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी येत असतो. स्नेह मेळावा कार्यक्रम नियोजित तारखेत होईल असे वाटत होते,
पण तसे झाले नाही स्नेह मेळावा आयोजित होऊ शकला नाही स्नेह मेळावा कार्यक्रमासाठी नियोजित केलेली तारीख आली तशी निघून चालली होती मी निराश हताश होतो कारण स्नेह मेळावा कार्यक्रम आज नाही तर उद्या होणार होताच पण मी हजर राहू शकणार नव्हतो. कारण काही दिवसांत माझी सुट्टी संपनार होती आणि मी माझ्या दूटीवर निघून जाणार होतो मी इंडियन आर्मि मध्ये आहे माझी सध्याच्याला लेह लडाख च्या अतिशय कठीण व दुर्मिळ असलेल्या कारगील क्षेत्रामध्ये बर्फाळ आणि दुर्गम पहाडी क्षेत्रावर देशांच्या शिमांचे रक्षण करण्यासाठी दुटीवर आहे मी एकदा सुट्टी संपवून दुटी वर गेल्यावर परत तिन चार महीने सुट्टी वर येऊ शकणार नाही हे माझ्या परिवारा सोबतच वर्ग मित्रांना ही माहिती असते. माझी सुट्टी समाप्त होण्या अगोदर पर्यंत माझ्या मित्रांनी स्नेह मेळावा कार्यक्रम आयोजित व्हावा यासाठी खुप सारे प्रयत्न केले त्यापैकी एक इंजिनिअर आदी हावळे नावाच्या मित्रानी माझ्यासाठी (मित्रप्रेमासाठी आणि त्याचे मिलट्री विषयी असणाऱ्या प्रेमापोठी माझी सुट्टी संपण्याच्या सेवटच्या दिवसा पर्यंत स्नेह मेळावा आयोजित व्हावा म्हणून खूप प्रयत्न करीत राहीला परंतू त्याच्या प्रयत्नांना यश आले नाही.
डिसेंबर पर्यंत मी सुट्टीवर होतो माझी सुट्टी संपली तेव्हा मला माझ्या कामावर जबाबदारीने हजर राहणे अत्यावश्यक होते आणि मी कारगीलला दुटीवर निघून गेलो
जानेवारी महिन्यात परत (१९९८ – ९९ ) वर्ग मित्रांच्या स्कूल फ्रेंडस व्हॉट्सॲप ग्रुपवर स्नेह मेळावा आयोजित करण्यात यावा म्हणून परत दुसऱ्यांदा मेशेज वायरल होऊ लागला आणि ०३ फेब्रुवारी २०२४ तारीख निश्चित करण्यात आली काही मित्रांनी या तारखेवर आक्षेप घेतला की त्या दिवशी काही कारणास्तव ते हजर राहू शकणार नाहीत कारण त्यांचे काही कार्यक्रम अगोदरच ठरलेले आहेत ०३ फेब्रुवारी २०२४ च्या तारखेवर वीचार करावा आणि तारखेत बदल करावा परंतू काही मित्रांनी ०३ फेब्रुवारी तारीख फाईनल तारीख आहे त्यात बदल होणार नाही असे निश्चित केले. मित्रांना माहिती होते आर्मीतला मित्र आताच सुट्टी संपवून दुटीवर गेला आहे तो आता सध्या तरी स्नेह मेळावाला येऊ शकणार नाही त्यासाठी विचार करणे अपेक्षीत होते पण तसा कोणीही प्रयत्न केला नाही. दुसऱ्या इतर मित्रांना त्यांची मुले १०वी १२ वीला आसल्या कारणाने त्यांचे बोर्डाचे प्रॅक्टीकल पेपर सुरू होते त्यांना स्नेह मेळाव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नव्हते त्यांनाही तारखेत बदल हवा होता पण त्यांचाही विचार केला गेला नाही काही शिक्षक मित्र होते त्यांना त्यांच्या विद्यार्थ्यांकडून बोर्डाच्या परीक्षा जवळ येऊन ठेपल्याने विद्यार्थ्यांकडून सराव करूण घेणे अत्यावश्यक होते त्यातच बोर्डाचे प्रॅक्टील पेपर ०३ फेब्रुवारी पासून सुरू होणार होते त्यामुळे शिक्षकांना स्नेह मेळाव्यात येता येणार नव्हते त्यांच्या साठी ०३ फेब्रुवारी तारखेत बदल हवा होता त्या शिक्षक मित्रांचा विचार केला गेला नाही. ०३ फेब्रुवारी २०२४ चा स्नेह मेळावा कार्यक्रम यशस्वी आयोजित व्हावा यासाठी जसा प्रयत्न झाला तसाच प्रयत्न १२ डिसेंबर २०२४ या दिवशी स्नेह मेळावा कार्यक्रम यशस्वी आयोजित व्हावा यासाठी प्रयत्न झाला असता तर मी स्नेह मेळावा कार्यक्रमात असलो असतो आनंदी असलो असतो पण तसे झाले नाही. स्नेह मेळाव्यात नसल्याचे दुःख या ठिकाणी व्यथित करीत आहे.
०३ फेब्रुवारी२०२५ ला उपस्थित राहू शकलो नाही याचे मला आतिशय जास्त दुःख आहे
मी मिलट्री मध्ये आसल्या कारणाने आजपर्यंत मला माझ्यावर आणि indian Army मध्ये आसल्याचा आणि देशसेवेसाठी काम करीत आसल्याचा गर्व होता.
०३ फेब्रुवारी नंतर मी स्वतःला अभागी समजतो. स्वतःला अनलकी समजतो
आजपर्यंत मित्र म्हणजे परिवाराचा एक भाग आहे असे वाटत होते रक्ताच्या नात्यापेक्षा मनाने जोडले जाणारे नाते मित्र प्रेम श्रेष्ठ असु शकते याची व्याख्या माझ्या मनाने तात्पुरती तरी बदलवून टाकलेली आहे
०३ फेब्रुवारी२०२५ नंतर मित्र कोण याविषयी माझ्या मनातील संकल्पना वेगवेगळ्या विषयावरून वेग वेगळ्या वळणावरून भरकटत आहेत त्याचा अजून मी शोध घेत आहे.
०२ डिसेंबर २०१२ स्पेन मधिल (नवेरा Navarra ) प्रांतामधील बुर्लाडा शहरात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय क्रॉस कंट्रीची मॅरेथॉन शर्यंत आयोजित केली होती त्या बुर्लाडा क्रॉस कंट्री दरम्यानचा किस्सा आहे .(7आबेल किप्रॉप मुताई ) च्या अज्ञानतेचा फायदा घेऊन शर्यतीत पुढे न जाता आबेल मुताईला पुढे जाण्यास सांगितले (17 इव्हान फर्नाडिज )क्रॉस कंट्रीच्या शेवटच्या टप्प्यात अंतिम रेषा पार करण्यासाठी १० मिटर अंतर अगोदरच स्पेनिस सांकेतीक साईन न समज ल्या मुळे आबेल मुताई थांबल्यावर इव्हान फर्नाडिज ने आबेल मुताईला ढकलत धक्का देत पुढे जाण्यास सांगितले.शर्यत संपल्या नंतर ( जर्सी नंबर 7आबेल किप्रॉप मुताई हा एक नंबर येऊन गोल्ह मिळतो तर जर्सी नंबर 17 इव्हान फर्नाडिज अनाया हा दुसऱ्या कमांकावर येऊन रजत पदक प्राप्त करतो त्यानंतर खुशी व्यक्त करताना
इव्हान फर्नांडिझ अनाया (स्पेन ) इव्हान हा लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतो, मुख्यतः क्रॉस कंट्री आणि मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत असतो.
०२ डिसेंबर २०१२ मध्ये स्पेन देशातील नवेरा (navarra) राज्याच्या बुर्लाडा शहरात आंतराष्ट्रीय प्रतिष्ठीत क्रॉसकंट्रीची शर्यंत आयोजित केली होती त्या बुर्लाडा क्रॉसकंट्री दरम्यानचा किस्सा आहे . (१० जानेवारी २०१३ ला सीएनए ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे ) बुर्लाडा कॉसकंट्री शर्यतीच्या अंतिम टप्प्यात आसताना आबेल मुताई अंतीम लाईन पार करण्या अगोदरच १० मिटर इतके अंतर कमी आसताना अचानक थांबला त्याचे कारण स्पेनिस भाषेतिल (साईन Sain ,सांकेतिक चिन्ह) न समजल्या मुळे धावताना थांबला आबेल मुताईला वाटले कि तो शर्यंत जिंकलेला आहे. अबेल किप्रॉप मुताईला वाटले की इथेच फिनिशिंग लाईनचा अंतीम टप्पा आहे. त्यातच सर्व दर्शक ओरडून आबेल मुताईला अजून धावण्यास सांगत होते तू अजून मागेच आहे अजून पुढे जा तू शर्यंत जिंकलेली नाही पण आबेल मुताई केनियायी आसल्याने व दर्शक स्पेनिस मध्ये ओरडून सांगत आसल्याने आबेल मुताईला काही कळेना त्यामुळे आबेल मुताई काही समजु शकला नाही आणि फिनिशिंग लाईन पार करण्यापुर्वी तिथेच थांबून ईकडे तिकडे पाहतच राहीला त्याचा प्रतिस्पर्धी मागोमाग काही अंतराव धावत येत होता जमतेम २० मिटर अंतरावर दुसऱ्या क्रमांकावर आसलेला इव्हान फर्नांडिझ अनाया त्या ठिकाणी पोहचला आता प्रत्येकालाच वाटत होते कि इव्हाणा फर्नाडिज अनाया आता आबेल मुताईला शर्मतित मागे सोडून पुढे जाईल व शर्यंत जिंकेल पण तसे झाले नाही हा प्रसंग इव्हाणा पर्नांडिज दुर वररूनच पाहत येत होता त्यामुळे इव्हाणा फर्नांडिज अनाया आचंबीत झाला. इव्हान फर्नांडिझ अनाया ने आबेल किप्रॉप मुताईला अजून धावण्यास ओरडून सांगत होता पण मुताई जागचा उभा राहिलेला हालेनासा झाला इव्हाना फर्नाडिज अनाया ने ओरडणाऱ्या दर्शकांकडे पाहीले तर ते दर्शक सुद्धा आबेल मुताईला अजून पुढे धावण्यास सांगत होते. इव्हान फर्नांडिझ अनाया च्या लक्षात आले की आबेल मुताईला स्पेनिस येत नसेल म्हणून इव्हान फर्नांडिझ अनाया ने आबेल मुताईला पुढे जाण्यास ढकलण्यास सुरुवात केली आबेल किप्रॉप मुताई ला पण नेमके काय चालले आहे हे उमजना पण अगदी १० मिटर पुढे गेल्यावर अंतिम लाईन पार केल्यावर आबेल मुताईला नक्की काय प्रकार झाला आहे ते समजले आबेल मुताईला गहीवरून आले आणि इव्हाना फर्नाडिजला गहीवरलेल्या अंतकरणाने कडकडून मिठ्ठी मारली
स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात आसताना आबेल किप्रॉप मुताई हा पहिल्या क्रमांकावर तर इव्हान फर्नाडिज दुसर्या कमांकावर धावत होते. अंतिम टप्पा पार करण्या पूर्वी दोघांच्यात खूप थोडे अंतर बाकी राहिले होते. इव्हान फर्नाडिज आबेल मुताईला मागे सोडून पुढे जाऊ शकला आसता आणि प्रथम क्रमांक मिळवू शकला असता पण इव्हान फर्नाडिज ने आबेल मुताईच्या अज्ञानतेचा गैरफायदा न घेण्याचे ठरविले आणि अशा पद्धतीने आबेल मुताई पहील्या क्रमांकावर आला. व इव्हान फर्नाडिज दुसऱ्या क्रमांकावर येऊन सुद्धा इव्हान फर्नांडेझने बुर्लाडा क्रॉस कंट्री शर्यतीदरम्यान हरवलेल्या मुताईला अंतिम रेषेकडे ढकलत असताना , आबेलमुताईला शर्यत जिंकवून दिली, व इव्हाणा फर्नाडिज व्हायरल झाला. अर्थातच या घटनेनंतर विजेत्या आबेलपेक्षा त्याला विजय बहाल करणार्या इव्हान फर्नाडिजचे संपूर्ण जगात कौतुक झाले. इव्हणा फर्नांडिसचे त्याच्या खेळातील कौशल्याबद्दल जागतिक स्तरावर अभिनंदन झाले.
आबेल किप्रॉप मुताई हा लंदन ऑलिम्पिक गेम्स २०१२ मध्ये रजत पदक विजेता होता. ऑलिम्पिक खेळाडूला हारवून इन्हाना फर्नाडिजला प्रसारमाध्यमांमध्ये हाईलाईट होता आले आसते पण त्याने तसे केले नाही
त्यानंत प्रसारर माध्यमांशी बोलताना आपल्या कृतीचे समर्थन करताना इव्हान फर्नांडिजने सांगितले की, ‘अबेल मुताई हाच स्पर्धेचा डिझर्विंग विनर होता. तो धावताना अचानपणे थांबला याचे एकमेव कारण म्हणजे त्याला स्पॅनीश भाषेतील साईन्सचा अर्थ समजला नाही.
याचा गैरफायदा घेउन मी सहजपणे त्याला मागे सोडून फिनिशिंग लाईन गाठून गोल्ड मेडल मिळवू शकलो असतो. परंतु हे क्रीडा भावनेच्या विपरीत वर्तन ठरले असते आणि ज्याचा मला आयुष्यभर पश्चाताप सहन करावा लागला असता. मी आबेलला जिंकवून देउन आपली अनेक महिने गमावू शकणारी झोप परत मिळवली आहे.’
अर्थातच इव्हान फर्नांडिजला त्या घटनेनंतर जगभरात प्रसिध्दी आणि आदर मिळाला तो विजेतेपद मिळवून कदापीही मिळाला नसता.
बोगस आणि बकवास भाकडकथा रचून लोकांना मूर्ख बनवणारे या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देऊ शकतील का?
देवधर्माच्या आड दडून समाजाला कुठवर लुटायचे, फसवायचे? त्यांचे मानसिक, आर्थिक, प्रसंगी शारीरिक शोषणही कुठवर करायचे? रोज नव्याचा शोध घेणाऱ्या जगाने ही हरामखोरी उघडी पाडली आहे. अशा षडयंत्राच्या जोरावर समाजावर सत्ता गाजवणाऱ्या लोकांची मुस्काडं विज्ञानाने फोडली आहेत. तरीही त्यांचा तोच तोच खेळ सुरू आहे.
१२ व्या व १३ व्या शतकाआधी म्हणजेच मुसलमान भारतात यायच्या आधी भारतातील बहुजन अर्थात एससी, एसटी, व्हीजे, एनटी, ओबीसी म्हणजे माळी, तेली, कुणबी, मराठा आणि इतर अठरापगड तथाकथित जातींमध्ये विभागलेल्यांचा शत्रू कोण होता?
मुसलमान यायच्या आधीचा इतिहास पाच हजार वर्षांचा आहे. आपला बहुजन राजा हिरणाक्ष, हिरण्यकश्यपू, बळीराजा, महात्मा चार्वाक, सिद्धार्थ गौतम, वर्धमान महावीर यांचा संघर्ष कोणा विरुद्ध होता?
जगाला शांती आणि समतेचा संदेश देणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या कत्तली करून, बौद्ध विहारे उद्ध्वस्त करणारे मुसलमान होते का?
हिंदू धर्मामध्ये वर्णव्यवस्था व जातीव्यवस्था मुसलमानांनी निर्माण केली आहे का?
कुणबी-मराठ्यांपासून ते सफाई कर्मचाऱ्यांपर्यंतच्या अर्थात, हिंदूंच्या पवित्र मानल्या जाणाऱ्या धर्मग्रंथांनुसार शूद्रांपासून ते अति शूद्रांपर्यंतच्या अठरापगड जातींतील लोकांच्या आणि समस्त स्त्रियांच्या शिक्षणावर बंदी घालून शतकानुशतके त्यांचा सर्वांगीण विकास रोखून धरणारे मुसलमान होते का?
चक्रधर, बसवेश्वर, नामदेव, ज्ञानेश्वर, कबीर, रवीदास, तुकाराम यांसारख्या संत-महात्म्यांचा अतोनात छळ करून आणि त्यांच्या हत्या करून त्यांच्यापैकी कुणी जिवंत समाधी घेतली, तर कुणी सदेह वैकुंठाला गेले असल्या थापा मारणारे मुसलमान होते का?
ज्या संत नामदेवांचे महाराष्ट्रातून पंजाबमध्ये – ‘गुरुग्रंथसाहेबा’मध्ये साठ-बासष्ट अभंग नोंदवले गेले, ते संत नामदेव जेव्हा महाराष्ट्रातील एका देवळापुढे कीर्तन करीत असतात, तेव्हा शूद्राला देवळापुढे कीर्तन करता येणार नाही, देवळाच्या पाठीमागे जाऊन तू कीर्तन कर अशी ताकीद देणारे आणि त्यांना देवळासमोरून हुसकावून लावणारे मुसलमान होते का?
नीतीनं वागणं हा खरा धर्म आहे. माणूसकीनं वागणं हा खरा धर्म आहे. रंजल्या-गांजल्या लोकांना जवळ करणं हा धर्म आहे, त्यामध्ये परमेश्वर आहे, त्यामध्ये साधुत्व आहे. इतका नैतिक धर्म सांगणाऱ्या, धर्माविषयी काहीतरी चांगलं मांडणाऱ्या जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या गाथा इंद्रायणी नदीत बुडवून तुकोबारायांची हत्या करणारे आणि ते सदेह वैकुंठाला गेल्याची आवई उठविणारे मुसलमान होते का?
शूद्र म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला मुसलमानांनी विरोध केला होता का?
छत्रपती शिवरायांवर पहिला वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी हा मुसलमान होता का?
छत्रपती शंभुराजांचे विरोधात एकदा नव्हे, तर अनेक वेळा कपट-कारस्थान रचून त्यांना उद्ध्वस्त करण्याचा कुटिल डाव आखणारे मुसलमान होते का?
छत्रपती शिवराय आणि शंभुराजांवर विषप्रयोग करणारे मुसलमान होते का?
स्त्रिया आणि अठरापगड जातींमध्ये विखुरलेल्या अलुतेदार-बलुतेदार बहुजनांच्या सर्व प्रकारच्या दुःखाचे, दारिद्र्याचे मूळ कारण शिक्षणाचा अभाव असल्याचे जाणून शिक्षण सर्वसामान्य लोकांच्या दारापर्यंत पोचावे यासाठी जिवाचे रान करणाऱ्या क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुलेंना विरोध करणारे आणि त्यांची हत्या करण्यासाठी त्यांच्यावर मारेकरी पाठवणारे मुसलमान होते का?
बहुजनांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या पहिल्या शिक्षिका, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुलेंवर शेण, दगड, चिखलमाती फेकून त्यांना छळणारे मुसलमान होते का?
नोकऱ्यांमध्ये असलेली ब्राह्मणांची मक्तेदारी मोडीत काढून स्वतःच्या राज्यात बहुजनांना सर्वप्रथम नोकऱ्यांची संधी देणारे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराजांची बदनामी करणारे आणि ‘शूद्रांचा राजा’ म्हणून छत्रपती शाहू महाराजांची टिंगलटवाळी करणारे मुसलमान होते का?
कथा-कादंबऱ्या, भाकडकथा, नाटक-चित्रपट, छद्मी इतिहास यांच्या माध्यमातून राजमाता मॉसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय आणि शंभू राजांचे हेतुपुरस्सर चारित्र्यहनन करणारे आणि त्यांची बदनामी करणारे मुसलमान होते का? आहेत का?
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी, समतावादी चळवळीला विरोध करणारे आणि त्यांची टिंगलटवाळी करणारे, त्यांना छळणारे मुसलमान होते का?
बहुजन एससी, एसटी व ओबीसी व मराठ्यांच्या न्याय्य हक्कांना आणि त्यांच्या आरक्षणाला विरोध करणारे मुसलमान आहेत का?
ओबीसींच्या जनगणनेला मुसलमान विरोध करतात का?
न्यायालय, मंत्रालय, सीबीआय, ईडी, निवडणूक आयोग, तसेच राज्य व केंद्रीय प्रशासनाच्या इतर विविध विभागांतील बहुजनांच्या अर्थात एससी, एसटी, ओबीसी, मराठ्यांच्या वाट्याला येणाऱ्या न्यायाधीश, राजदूत, सचिव दर्जाच्या अति उच्चपदस्थ जागा मुसलमान बळकावून बसले आहेत का?
देशातील अठरापगड जातींमध्ये विभागलेल्या बहुजन शेतकरी-शेतमजूर, कामगारांचे शोषण करणारे मुसलमान आहेत का?
असे बरेच प्रश्न विचारता येऊ शकतात. परंतु, सुशिक्षित आणि सद्सद्विवेकबुद्धी असणारे लोक या सगळ्या प्रश्नांची उत्तरे न विचारता सध्या देशात धार्मिक उन्माद निर्माण करणाऱ्यांच्या हातचे बाहुले बनले आहेत. सध्या अशा जातीवादी, खुनशी व गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या हाती देशाची सूत्रे एकवटली आहेत. परिणामी, देशाचा विकास थांबून देश किमान शंभर वर्षे मागे गेला आहे. हे सर्व पाहता शेवटी या देशाचे पुढे काय होणार असा प्रश्न किमान बुद्धिमान व्यक्तींना ज्या दिवशी पडेल आणि ते वर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे ज्या दिवशी विचारणे सुरू करतील, ज्या दिवशी ते राजकारणाच्या गुडघ्यातून मान बाहेर काढून या प्रश्नांकडे पाहतील त्या दिवशी सभोवतालचे सत्य त्यांना दिसेल. तोच परिवर्तनाचा दिवस समजावा!