Category Archives: Uncategorized
आपला देश
आपला देश लाख वाईट असेल पण जोपर्यंत, खच्चून भरलेल्या लोकलच्या डब्यात दुसऱ्याच्या कडेवरच्या लहान मुलाला मांडीवर घेऊन कोणीतरी खिडकीबाहेरची गंमत दाखवतं, लेटमार्क लागू नये म्हणून धावणाऱ्या एखाद्याला दरवाजातले चार हात उचलून आत ओढून घेतात, पुलावरच्या गर्दीत कुणीतरी टाकून दिलेला, हात पाय नसलेला भिकारी कुणाच्याही पायाखाली येत नाही, लोक त्याला पायही न लावता पुढे निघून जातात,Continue reading “आपला देश”
रावण राजा बहुजणांचा
आपला जन्मच बलात्कारातून झालाय, विवाहाशिवाय आपली आई आणि दोन मावश्या बाप म्हणून आजपर्यत मिरवलेल्या नराधमाकडून इच्छा नसताना गरोदर राहिल्या. पुढे वेळ निघुन गेल्यावर मात्रुत्वाच्या संवेदनांत बलात्काराच्या वेदना त्या विसरल्या. हे जेव्हा त्या नुकत्याच कुमारवयात प्रवेश करणाऱ्या मुलाला कळालं, तेव्हा हादरलेल्या त्या तरूणाची झालेली अवस्था भयानक होती.आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंतचा त्याचा प्रवास आणि नंतरचंं परिवर्तन सगळच जबराटपणे वContinue reading “रावण राजा बहुजणांचा”
गणपती च्या दिवसांत बहुजणांची मुले आणि उच्च वर्णियांची मुले यांच्यामध्ये असलेली तफावत
चिन्मय फडके, तन्मय कुळकर्णी व अर्थव गाडगीळ हेच नाही तर त्यांचे आजोबा-पणजोबा सुद्धा शिक्षणासाठी, नौकरी-व्यवसायासाठी 100 वर्षा आधीपासुन सातसमुद्र ओलांडून युरोप-अमेरिकेत स्थलांतरीत झालेले आहेत.ज्या काळात त्यांच्या वैदिक धर्मानुसार समुद्र पार करून जाणे हे महापाप समजल्या जात होते, त्या काळात, धर्माच्या कर्मठ परंपरांना धाब्यावर बसवुन चिन्मय, तन्मय व अर्थव चे आजोबा-पणजोबा परदेशात गेले. आता त्यांचा जवळपासContinue reading “गणपती च्या दिवसांत बहुजणांची मुले आणि उच्च वर्णियांची मुले यांच्यामध्ये असलेली तफावत”
रामराज्य
रामराज्य हे फक्त नाव गोंडस आहे. पौराणिक काळात रामराज्यात शूर्पनखेचे नाक कापले गेले, सीतेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला अग्निपरीक्षा द्यायला लावली गेली आणि ब्राम्हणाच्या खोट्या आरोपावरून शंबुक नामक शूद्राचा खून झाला. थोडक्यात स्त्री आणि शूद्र यांना कसलीही किंमत नव्हती. मध्ययुगीन रामराज्याच्या कल्पनेत रामचरीतमानसमध्ये (जे आमच्या लहानपणी लता मंगेशकर रेडिओवर भावपूर्ण आवाजात गाऊन दाखवायच्या) स्त्रिया, दलित,Continue reading “रामराज्य”
विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले
सावित्रीबाई स्मृतिदिनानिमित्त लेख…. भारतीयांच्या विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले -डॉ. श्रीमंत कोकाटे विद्येची देवता म्हणून आपण सरस्वतीचे पूजन करतो, परंतु सरस्वतीने आपल्या देशात बालवाडी, शाळा, महाविद्यालय सुरू केले का?. कोणाला अध्यापन केल्याची नोंद आहे का?. तसा कोणताही पुरातत्त्वीय किंवा ऐतिहासिक पुरावा नाही. सनातनी परंपरेने स्त्री शिक्षणावरती बंदी घातली होती, त्यामुळे ब्राह्मण स्त्रियांना देखील शिक्षणाचा अधिकारContinue reading “विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले”
चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर ५० वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार – केकी मुस
कैकुश्रु माणेकजी ऊर्फ केकी मूस १४ फेब्रुवारी, हा दिवस दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींसाठी खास असतो. ते या दिवशी आपल्या प्रेमाची कबुली देतात आणि एकमेकांसोबत रोमॅन्टीक वेळ घालवतात. प्रत्येक प्रेम करणाऱ्यां युवकांची ही कहाणी त्यांच्यासाठी खास असते. हेच ते क्षण असतात, जे प्रेमी युगुल नेहमीच आपल्या आठवणीत साठवून ठेवतात आणि या आठवणी संपूर्ण आयुष्यभर घालवतात. याContinue reading “चाळीसगाव रेल्वे स्टेशनवर ५० वर्षं प्रेयसीची वाट पाहणारा महान कलाकार – केकी मुस”
इयत्ता १०वी १९९८-९९चा स्नेह मेळावा
शालेय जिवणातील आठवणीत राहणारे वर्षे म्हणजे १०वी चे वर्षे असते. १० वी नंतर पुढिल शिक्षणासाठी प्रत्येकाच्या वेगवेगळ्या दिशा आसतात प्रत्येकाची परिस्थिती वेगवेळी असते प्रत्येकजण परिस्थितीचा सानाना करीत इतरत्र शिक्षणासाठी स्थलांतरीत होतात. त्यामुळे कॉलेज बदलली जातात काही विद्यार्थी वेगवेगळ्या शहरातील नामांकित कॉलेजला ॲडमिशन घेतात आर्टस कॉमर्स सायन्स हे आपआपल्या आवडीने निवडीचे विभाग आसतात अशा एक नाContinue reading “इयत्ता १०वी १९९८-९९चा स्नेह मेळावा”
तो शर्यत जिंकू शकत होता परंतू त्याने समोरच्याला शर्यतीत जिंकवून दिले आणि खेळ भावनेचे उत्तम उदाहरण जगापुढे ठेवले.
इव्हान फर्नांडिझ अनाया (स्पेन ) इव्हान हा लांब पल्ल्याच्या धावण्याच्या स्पर्धांमध्ये भाग घेतो, मुख्यतः क्रॉस कंट्री आणि मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेत असतो. ०२ डिसेंबर २०१२ मध्ये स्पेन देशातील नवेरा (navarra) राज्याच्या बुर्लाडा शहरात आंतराष्ट्रीय प्रतिष्ठीत क्रॉसकंट्रीची शर्यंत आयोजित केली होती त्या बुर्लाडा क्रॉसकंट्री दरम्यानचा किस्सा आहे .(१० जानेवारी २०१३ ला सीएनए ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे )बुर्लाडाContinue reading “तो शर्यत जिंकू शकत होता परंतू त्याने समोरच्याला शर्यतीत जिंकवून दिले आणि खेळ भावनेचे उत्तम उदाहरण जगापुढे ठेवले.”
भारत देशातील सर्व गोष्टींना मुसलमान जबाबदार असु शकतो काय
सर्व गोष्टीला मुसलमानच जबाबदार आहेत का? बोगस आणि बकवास भाकडकथा रचून लोकांना मूर्ख बनवणारे या प्रश्नांची तर्कसंगत उत्तरे देऊ शकतील का? देवधर्माच्या आड दडून समाजाला कुठवर लुटायचे, फसवायचे? त्यांचे मानसिक, आर्थिक, प्रसंगी शारीरिक शोषणही कुठवर करायचे? रोज नव्याचा शोध घेणाऱ्या जगाने ही हरामखोरी उघडी पाडली आहे. अशा षडयंत्राच्या जोरावर समाजावर सत्ता गाजवणाऱ्या लोकांची मुस्काडं विज्ञानानेContinue reading “भारत देशातील सर्व गोष्टींना मुसलमान जबाबदार असु शकतो काय”